शंकरपूर व भिसी ला सभागृहे मंजूर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला आले यश
शंकरपूर व भिसी ला सभागृहे मंजूर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला आले यश
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
चिमूर विधानसभा क्षेत्रात आमदार किर्तीकुमार भांगडीया हे रस्ते ,इमारती ,सभागृहे ,विविध स्तरावरील कामे खेचून आणीत असून अनेक कामे पूर्ण झाली असून ते दिलेला शब्द पूर्ण करीत असून त्यांनी भिसी येथील परमात्मा एक सेवक या मंडळास व शंकरपूर येथील संताजी जगनाडे महाराज मंडळास 25/15 मधील निधी 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात यश आले आहे
भिसी येथील परमात्मा एक सेवक या मंडळास जागा उपलबद्ध होती परंतु सभागृह बांधकाम साठी अडचण निर्माण झाली ही बाब कार्यकर्त्यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे कडे लक्षात आणून दिली तेव्हा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दखल घेत 25 /15 या योजनेतून 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला
त्याबद्दल परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक डोमळू ठोबरे चंद्रशेखर रेवतकर धनराज खेरे नथु रेवतकर श्रावण गायधनी तेजराज फाये सुरेश टोबरे दीपक नौकरकर धनराज इंगोले रमेश वरघणे आदी सेवकांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे आभार व्यक्त करीत समाधान व्यक्त केले
शंकरपूर या परिसरात मोठया प्रमाणात तेली समाज बांधव असल्याने एक मोठा सभागृह असणे आवश्यक असल्याने अनिल शेंडे यांच्या नेतृत्वात आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना निवेदन देऊन सभागृह बांधकाम करण्याची मागणी केली
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी तात्काळ दखल घेत 25/15 मधून 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला असल्याने आशिष समर्थ, प्रभाकर करकाडे , सुरज समर्थ, कविश चौधरी, अंकुश करकाडे, कैलास सहारे, पिंटू सहारे, गुरुदेव निकुरे, मंगेश शेंडे, निखिल भजनकर रमेश चौधरी, जयश चौधरी, विजय टिपले ,नारायण चौधरी, अनिल शेंडे , वसंत चौधरी, आशिष टिपले, आदी समाज बांधवांनी अभिनंदन व्यक्त करीत समाधान व्यक्त केले..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!