झरी येथील विद्यार्थ्यांना जावे लागते चिखलातून

झरी येथील  विद्यार्थ्यांना  जावे लागते चिखलातून


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
 येथून जवळच असलेल्या झरी येथे जिल्हा परिषद शाळा असून येथिल  शालेय  विद्यार्थ्यांना  शाळेत चिखलातून जावे लागत असून याकडे  ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे
           झरी  हे गाव तीनशे लोकवस्तीचे असून या गावात एक ते चार वर्ग आहे या चार ही वर्गात पंचवीस विद्यार्थी शिक्षण घेत आहे मात्र या विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी चक्क चिखलातून वाट काढून शाळेत जावे लागत आहे
           ही जिल्हा परिषद शाळा शेताला लागून असून या शाळेत जाण्यासाठी आतापर्यंत साधा रस्ता ही तयार करण्यात आला नाही.  मुख्य रस्त्यापासून ही शाळा तीनशे मिटर अंतरावर आहे आतापर्यंत या रस्त्यावर साधा मुरूम सुधा टाकण्यात आला नाही.  त्यामुळे येथिल विद्यार्थ्यांना  चिखलातून पाय तुडवित  जाऊन शिक्षण घ्यावे  लागत आहे. या रस्त्यावर कित्येक विद्यार्थी घसरून पडले असून दुखापतग्रस्त झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने व ग्राम पंचायत ने याची दखल घेऊन या रस्त्यावर मुरूम टाकून द्यावा. अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!