घोडाझरी संघर्ष समिती तर्फे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे-आ.बंटीभाऊ भांगडिया

घोडाझरी संघर्ष समिती तर्फे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे-आ.बंटीभाऊ भांगडिया  



मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )


मोटेगाव : - चिमूर मतदार संघातील घोडाझरी तलावात गोसिखुर्द धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी घोडाझरी संघर्ष समिती ची अनेक वर्षांपासून असलेली मागणी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे अथक प्रयत्नाने नुकताच मंजुरी प्राप्त झाली असल्याने आज तळोधी येथे घोडाझरी संघर्ष समिती तर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.      भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्यासाठी योजना अंमलात आणत आहे तसेच घोडाझरी अंतर्गत हजारो हेक्टर शेत जमीन ओलिताखाली असून आता गोसिखुर्द सिंचन चे पाणी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाले असल्याने शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार असून प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचा लाभ प्राप्त होणार आहे.असेही कार्यक्रमाप्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडिया साहेब बोलत होते.जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वित्त नियोजन वन मंत्री महाराष्ट्र राज्य मान. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांच्या विशेष सहकार्याने घोडाझरी तलावात गोसिखुर्द चे पाणी उपलब्ध करण्यास मजुरी मिळाल्याबद्दल कार्यक्रमाप्रसंगी विशेष आभार मानण्यात आले.  यावेळी भाजप जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूरकर, जिल्हा महामंत्री तथा जिप सदस्य संजयभाऊ गजपुरे, तालुका अध्यक्ष होमदेवभाऊ मेश्राम, राजुभाऊ देवतळे, आवेशभाऊ पठाण, रमेशभाऊ बोरकर, ईश्वर कामडी, वासीद जी शेख, वसंत जी बडवाईक,संतोषभाऊ रडके, वामन जी मदनकर, राजूभाऊ रामटेके, भास्कर जी कामडी, भास्कर जी लोनबले, अशोक जी ताटकर, नरेंद्र जी कामडी आदींसह भाजप पदाधिकारी व घोडाझरी संघर्ष समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!