सावली शहरात सुरू असलेले अवैध धंद्यावर अंकुश निर्माण करा
सावली शहरात सुरू असलेले अवैध धंद्यावर अंकुश निर्माण करा
"सावली शहर सुधार समिती चे पोलिस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन"
सावली (सुरेश कन्नमवार)
सावली : - सावली शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध व्यवसायांना ऊत आला आहे, अवैध दारू विक्री,मादक पदार्थ ( गांजा), सुगंधित तंबाखू विक्री तसेच सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे, बिनदिक्कत चालू असलेल्या या अवैध व्यवसायाचा परिणाम सावली शहरातील लहान मुले, शाळकरी, महाविद्यालयीन मुले, नागरिक, महीला यांच्या सामाजिक, कौटुंबिक व शारीरिक स्वास्थावर होत असल्याने याचे सामाजिक भान लक्षात घेऊन अशा अवैध धंद्यावर अंकुश निर्माण करण्यासाठी याबाबतचे निवेदन सावली शहर सुधार समितीच्या वतीने नुकतेच पोलिस निरीक्षक, तहसीलदार यांना देण्यात आले.
राज्य सरकारच्या चंद्रपूर जिल्हा दारूबंदी चे स्वागत करण्यात आले , पण अल्पावधीतच गावागावात,
मोहल्यात अवैध दारू विक्री व्यावसायिकांची संख्या वाढली, बेकायदेशीर दारू विक्री त प्राप्त होणा-या जलद पैशाच्या मोहात तरुण पिढी याकडे वढत आहे, बेरोजगार , शालेय विद्यार्थी या व्यवसायात अडकतांना दिसत आहेत, ऐवढेच नाही तरुण पिढी सुध्दा दारुच्या आहारी जात आहेत असे विदारक चित्र सावली शहरात दिसत आहे, तसेच गांजा चे व्यसन सुध्दा तरुणांना जडतआहे, शाळा महाविद्यालयीन मुले टोळी बनवून गांजा पिताना दिसतात ,सिंचाई विभागाजवळ, बाजार चौक आदी परिसरात गांजा पिताना देशाचे भविष्य दिसत आहेत, त्याचप्रमाणे सुगंधित तंबाखू जन्य पदार्थ विक्री करणारे पानठेले शाळा महाविद्यालय परिसराच्या शंभर मीटर दुर असायला पाहिजे पण तसं न दिसता तंबाखू जन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असुन अनेक पुरुष महीला यांना कन्सर रोग जडला आहे तर काही चे यामुळे निधन झाले .या समस्या घेऊन चर्चा करण्यात आली.
सावली शहरात काही दिवसांपूर्वी हद्दपार झालेला सट्टा व्यवसाय सुध्दा तेजीत आहे अनेक तरूण, महीला, वयस्कर यात मग्न आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!