धडक सिंचन विहीर कार्यक्रम.

धडक सिंचन विहिरी चा लक्षांक वाढविण्याची मागणी.

 ऑनलाइन लिंक फेलचा  शेतकऱ्यांना फटका.

 मुल (प्रकाश चलाख)

 धडक सिंचन विहीर कार्यक्रम योजनेअंतर्गत यावर्षी सन 2019- 20 करिता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात  शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते . नुकतीच ही यादी शासनातर्फे प्रत्येक तालुक्यात सिंचन विभागात प्रकाशित करण्यात आली असून  ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या  शेतकऱ्यांना ऑनलाइन लिंक्स फेलच्या  फटका बसल्याचे दिसत आहे.

 उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत पूर्व विदर्भात पाऊस  समाधान कारक होते. परंतु  अनियमित व खंडित पावसामुळे आणि सिंचनाचे योग्य सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने शेतातील पिकांवर विपरीत परिणाम होतो. उत्पादनात लक्षणीय घट  होत असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे .करिता शासनाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी 13000 सिंचन विहीर कार्यक्रम सन 2019 -20 करिता हाती घेतला आहे.

 शेतकऱ्यांच्या हितासाठी मनरेगाअंतर्गत व धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी करिता शासनाने हे दोन योजना चालू केले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत शेतात सिंचनाची सोय प्राप्त केली आहे. परंतु अजून पर्यंत ही  सिंचनाचा पूर्ण लक्ष्यांक  न   गाठल्यामुळे  सदर योजनेअंतर्गत  अधिक लाभ घेण्याचे  शासनाचे धोरण आहे.

 धडक सिंचन विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांकडून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी धडक सिंचन विहीर योजना अंतर्गत आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी या  योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर  केलेले  होते.

 धडक सिंचन विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या पद्धतीने ऑनलाईन अर्ज प्राप्त करून संबंधित शेतकऱ्याला फायदा देणे हे योजनेत नमूद आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात धडक सिंचन विहीर योजना कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

मुल तालुक्यातून  एकूण 674 शेतकऱ्यांनी विहिरीसाठी ऑनलाइन अर्ज संबंधित विभागाकडे सादर केलेला आहे .परंतु तालुक्याला शंभर विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले असल्यामुळे  अनेक ऑनलाइन अर्ज धारक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे .तालुक्याला मिळणारा विहिरींचा लक्षांक हा 10 टक्याच्या आत असून वाढीव कोटा देण्याची गरज आहे.

 तालुक्याला देण्यात आलेले शंभर  विहिरींचे उद्दिष्ट हे पुरेसे नसून यात वाढ करण्यात यावी. व सर्व ऑनलाईन अर्ज धारक शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरी चा लाभ देण्यात यावा अशी  विनंती तालुक्यातील ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची  आहे.

  हे करीत असताना ऑनलाइन लिंक फेल चा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला असून अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे .फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शासनाने नमूद केलेल्या तारखेला वेळेवर तालुक्यातील अनेक शेतकरी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक केंद्रावर गेले असता त्यावेळेला लिंक फेल्युअर होती. तालुक्‍यातील अनेक शेतकरी वाट पाहून माघारी परतल्यानंतर लिंक सुरू झाली.  त्यामुळे लिंक फेलचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर  बसला आहे.

 काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले परंतु  शासनाकडे चालन भरतांना लिंक्स फेल होती अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. शासकीय रक्कम अर्जासोबत भरीत असताना लिंक  फेल असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रक्कम शासनाकडे जमा झाली नसल्याने असे शेतकरी मागील क्रमांकावर गेल्याचे प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत दिसत आहे .

त्यामुळे एकंदरीत पाहता शासनाने राबवित असलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा फायदा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांना वंचित ठेवणार असल्याचे दिसत असून अनेक ऑनलाइन अर्ज सादर केलेले शेतकरी तालुक्याला दिलेल्या शंभर विहिरीच्या उद्दिष्टांमध्ये बसत नसल्याने आणि ऑनलाईन  लिंक फेल मुळे वंचित राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे तालुक्याला दिलेले उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे . अशी कळकळीची विनंती क्षेत्राचे लोकप्रिय  नेते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे तालुक्यातील ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची  केली आहे.


  "धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत विहिरीचा लाभ घेण्याकरिता मी पहिल्याच दिवशी फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन अर्ज  केला. नुकताच जाहीर झालेल्या सिंचन विभागाच्या  कार्यालयात अर्ज भरलेला अनुक्रमांक बघितला असता   550 च्या वर माझा अनुक्रमांक आहे . अगदी सुरुवातीला अर्ज केला अनुक्रमांक शेवट आहे कारण कळले नाही. मुल तालुक्याला शासनातर्फे शंभर विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे स्वाभाविकच माझे सारखे शेतकऱ्यावर धडक सिंचन विहीर योजनेपासून  वंचित राहण्याची  वेळ आली आहे."

  नीलकंठ नारायण  भुरसे
        शेतकरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!