अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-या विना अनुदानित शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध चिमूर येथे उपविभागिय अधिका-यांना दिले निवेदन
अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-या विना अनुदानित शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध
चिमूर येथे उपविभागिय अधिका-यांना दिले निवेदन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर शांततामय व सनदशीर मार्गाने आंदोलन करणा-या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.यात शेकडो अनुदानित शिक्षक गंभीर जखमी झाले.पगार मागण्याकरिता गेलेल्या शिक्षकांना सरकारने लाठ्या दिल्या.या लाठीहल्ल्यात शेकडो शिक्षक गंभीर जखमी झाले.या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी चिमूर येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.
अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षकांंचे अनुदानाकरिता आंदोलन सुरु आहे.मात्र शासनाचे या विनाअनुदानित शिक्षकांच्या मागणीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष आहे.अनेक शिक्षकांनी आपले जीवन संपवले आहे.स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या केल्या.अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.तरीही शासनाला या विनाअनुदानित शिक्षकांकडे बघण्याला वेळ नाही.
मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तथा विनाअनुदानित शिक्षकांना कोणतीही शैक्षणिक अट न लादता १००% अनुदान मंजूर करावे या मागणीचे निवेदन चिमूर येथे उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.निवेदन देताना शिक्षक भारतीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,रावन शेरकुरे,संजय बरडे,राकेश पंधरे,दीपांकर धोटे,सुरज तिडके,प्रविण लोहकरे,उमेश पडोळे,सुरेश चौधरी,रणभिल
डावे,शंभरकर,खोब्रागडे,नैताम आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!