नेरीच्या तंटामुक्त समितीला मिळाला युवा अध्यक्ष
नेरीच्या तंटामुक्त समितीला मिळाला युवा अध्यक्ष
चुरशीच्या लढतीत पिंटू खाटीक विजयी
मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )
मोटेगाव : - चिमूर तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या नेरी येथे ग्राम पंचायत च्या पटांगणात पार पडलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या निवडणुकीत पिंटू सुरेश खाटीक याने चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. निवडून आल्यानंतर या गावातील सर्व तंटे सलोख्याने मिटवून शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी प्रयत्न करणार तसेच अवैध धंदे बंद करणार आल्याचे युवा तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू खाटीक यांनी सांगितले. विजयाबद्दल नेरीतील अनेक मार्गदर्शक मंडळी, युवावर्ग,माता भगिनींनी यावेेळी शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!