नेरी परीसरात घरांची पडझड सततधार पावसामुळे अनेकाचे नुकसान

नेरी परीसरात  घरांची पडझड  

सततधार पावसामुळे अनेकाचे नुकसान                             


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमूर तालुक्यातील रात्री एक वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या संततधार पावसाने चिमूर तालुक्यातील नदी,नाले ओसंडून वाहत आहेत तर नेरी परीसरात  मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालेली आहे चिमूर तालुक्यातील चिमूर ते पिपरडा शिंदेवाही मार्ग सकाळी ०६:०० वाजता पासूनच बंद झालेला आहे. पडसगाव जवळील   भडका पुलावर पाणी आहे.
नेरी परीसरात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे पळसगाव येथील प्यारेलाल इदूरकर ,पंकज पाटील , दामोदर रामटेके , सखाराम गुरनुले, कुष्णा पाटील , तर वडसी येथील मधूकर आत्राम ,नवतडा येथील गणेश दिघोरे ,सोमा मोहुर्ले ,वच्छला शेंडे ,श्रिराम ननकटे ,श्रावन शिवरकर ,बुधाराम शिवरकर, देविदास शेंडे , पुंडलिक मेश्राम , घनश्याम शिवरकर , मारोती चाके ,उपासराव गढाईत , अशोक पोटवार , हेमचंद्र शिवरकर, मधूकर शिवरकर , अनुसया सुरनकर इत्यादी नागरिकांची घरांची पडझड झाल्यचे वुत्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!