श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच स्वर्गीय गोटूलालजी भांगडीया व स्वर्गीय धापूदेवी भांगडीया यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ भव्य दही हंडी स्पर्धा संपन्न

श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच स्वर्गीय गोटूलालजी भांगडीया व स्वर्गीय धापूदेवी भांगडीया यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ भव्य दही हंडी स्पर्धा संपन्न

चिमूर क्रांती जिल्हा होणारच
- आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केली दहीहंडी कार्यक्रमात गर्जना 

सिने अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी रिझविले युवकांना 



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - दिनांक.२६/०८/२०१९ चिमूर क्रांती भूमी व श्रीहरी बालाजी महाराजाचा आशिर्वाद व आपल्या मातृशक्ती च्या आशिर्वादाने मी लोक प्रतिनिधी झालो असून जो विश्वास जनतेनी माझ्यावर दर्शविला त्याला तडा जाऊ न देता राजकारण सोबत सामाजिक उपक्रमाचा वसा सतत कायम ठेवला परंतु १६ ऑगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमात नियोजनापेक्षा जास्त मातृशक्ती ही भाऊ बहिनीच्या प्रेमा-पोटी कोणत्याही आमिषाला न जुमानता महिला मोठ्या प्रमाणात आल्या परंतु विरोधकांनी अपप्रचार केला त्याचा खरपूस समाचार घेत आमदार किर्तीकुमार भांगडीया विरोधकांवर कडाडत बोलले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात का सामाजिक उपक्रम केले नाही असा सवाल करीत राज्यात जेव्हा जिल्हे निर्माण होणार तेव्हा चिमूर क्रांती जिल्हा करणारच अशी गर्जना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केली .
स्व.गोटूलालजी भांगडीया व स्व.धापुदेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहीहंडी स्पर्धा नेहरु कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात किर्तीकुमार भांगडीया बोलत होते.वसंत वारजूकर भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा , जि.प. समाजकल्याण सभापती  ब्रिजभूषण पाझारे , प्रकाश वाकडे राजू देवतळे , बकाराम मालोदे ,नगरसेवक अब्दुल कदिर शेख ,विनोद चोखरे , विनोद अढाल , एकनाथ थुटे , अशोक कामडी प्राचार्य धम्मानी ,भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष पायल कापसे , नगरसेविका छाया कनचलवार,  माधवी नाईक , माया नन्नावरे , पुष्पा हरणे , मनीषा कावरे , इंदू येरचे , नाजीया शेख , प्रिया जयकर व आदी उपस्थित होते.
       मराठी सिने अभिनेत्री नेहा पेंडसे नी युवतींना बोलावून ( शिलाच्या आईच्या घो ) या गाण्यावर नृत्य सादर केले.या गाण्यावर युवक युवती ना रिजविले . या दरम्यान दहीहंडी स्पर्धेचे उदघाटन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले. आयोजन समितीच्या वतीने गोविंदा गोविंदा च्या निनादात आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा सत्कार करण्यात आला .
शितला माता मंदिर मंडळ चंद्रपूर या संघाने प्रथम पारितोषिक पटकावित  रोख ३१ हजार रुपये मिळविले तर  न्यू विदर्भ गोविंदा पंथक मोठा दिघोरी भंडारा या संघाने  द्वितीय पारितोषिक २१ हजार संघाने मिळविले.या कार्यक्रमाचे संचालन विवेक कापसे यांनी केले तर आभार नैनेश पटेल यांनी केले.
दही हंडी स्पर्धा समिती चे बंटी वनकर व गोलू भरडकर ,यांच्या नेतृत्वात सचिन डाहुले ,  श्रेयस लाखे , अमीन पटेल , अमित जुमडे , गजू राऊत , पराग अंबादे , सैफ शेख , गोलू मालोदे , अरबाज खान , विकी कोरेकार ,उत्कर्ष मोटघरे , व आदी युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास हजारो च्या संख्येने पुरुष व महिला युवा वर्ग उपस्थित राहून गुण्या गोविंदाने आनंद साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!