पवनपाार येथील अंगनवाडीत पोषन आहारात अळ्या

पवनपाार येथील अंगनवाडीत पोषन आहारात अळ्या 
 बालकांचे आरोग्य धोक्यात 


पवनपार (जितेंद्र पेंदाम)
चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पवनपार येथील अंगनवाडीच्य पोषण आहारात अळ्यां आढळल्याने बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंगनवाडीतील बालकांना पोषण आहार मिळावा त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हनुन शासनाने त्यांना अंडी, केळी, सेप, शेंगदाने, गुळ वगैरे द्यायचे आहे. कुपोषीत बालकांची विशेष काळजी घ्यायची असते. परंतु येथील अंगनवाडीच्या पोषण आहारात चक्क अळ्या आढळल्याने  बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्मान झाला आहे. या बाबीकडे लक्ष घालावे याकरीता संम्पुर्ण बालकांचे मातांनी संबंधीत विभागाकडे मागणी केली आहे.  पंरंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


या गंभीर बाबीकडे  पंचायत समिती सदस्य राहुल पोरेड्डीवार आणि रुपाताई सुरूपाम जिल्हा परीषद सदस्य यांनी दखल घेतली. त्यानी लगेच अंगणवाडीला भेट दिली.  बालकांचा विचार करता वरीष्ठांनी चौकशी करुन  कराशी मागनी सरपंचा निता वाढई आणि उपसरपंच संदिप गुरूनुले यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!