मुरपार वेकोलीच्या सेक्युरिटी इंचार्जच्या संगमतानेच वेकोली मधील भंगार ची होत होती चोरी

मुरपार वेकोलीच्या सेक्युरिटी इंचार्जच्या संगमतानेच वेकोली मधील भंगार ची होत होती चोरी


सेक्युरिटी इंचार्ज संशयाच्या भोवऱ्यात

सेक्युरिटी इंचार्ज देतात उडवाउडवीची उत्तरे

जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )


जांभुळघाट : - चिमुर तालुक्यातील खडसंगी जवळील मुरपार परियोजना भूमिगत खदान असून, या खादानीचे सेक्युरिटी इंचार्जम्हणून काकडे आहेत. त्यांच्या हाताखाली १० सेक्युरिटी मुरपार वेकोलीत काम करतात. यात प्रत्येक शिफ्ट ला ३ सेक्युरिटीची ड्युटी असते. यात एक चेक पोष्ट वर तर अन्य दोन वेकोलीत तैनात असतात.  यात सेक्युरिटी इंचार्ज काकडे यांना प्रतिनिधींनी वेकोलीतील चोरी बाबद्द विचारणा केली असता, उडवाउडवी ची उत्तरे देत सांगत होते कि, वेकोलीत या अगोदर पण असे भंगार चोरी होत होते. असे सांगत असतात प्रतिनिधींनी अजून उकल काढण्याचा प्रयन्त केला असता जेव्हा या अगोदर वेकोलीतून भंगार चोरी जात होता. आणि हि बाब वेकोलीचे सेक्युरिटी इंचार्ज ला माहीत होते तर या अगोदर पोलीस स्टेशन ला माहिती का कळविली नव्हती, वेकोलीत सेक्युरिटी तैनात असतांना इतक मोठ भंगार चोरी झालेच कसे, असे प्रश्न प्रतिनिधींनी विचारले असता, सेक्युरिटी इंचार्ज काकडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असता यात सेक्युरिटी इंचार्ज वरच संशय वाटत असून, त्यांच्याच संगनमताने मुरपार भूमिगत वेकोली मधून चोरी होत असल्याचे प्रकार समोर येतो आहे. यावर चिमूर पोलिसांनी चक्रे फिरवून मुरपार वेकोलीचे सेक्युरिटी व सेक्युरिटी इंचार्ज यांची झडती घेतल्यास वेकोलीचे प्रकरण वेगळ्याच वळणार जाण्याची शक्यता असून, या चोरीत वेकोलीचेच कर्मचारी अजून साथीदार असल्याचे संशय व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!