चंद्रपूर जिल्हा कचेरीवर ग्रामसेवकाचे धरणे आंदोलन

चंद्रपूर जिल्हा कचेरीवर  ग्रामसेवकाचे धरणे आंदोलन


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - दिनांक १३/०८/२०१९ चंद्रपूर कोण म्हणतो देणार नाही, मागण्या आमच्या हक्काच्या, आमच्या मागण्या मान्य करा’ अशा घोषणा देत ग्रामसेवक युनियनकडून जिल्हा परिषदे. चा परिसर दणाणून सोडण्यात आला.ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पदाची निर्मिती करावी, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासननिर्णयाप्रमाणे लागू करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदल करून पदवीधर ग्रामसेवक होण्याबाबत निर्णय घेण्यात यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा चंद्रपूर वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. 
 जिल्हा परिषद समोर झालेल्या एकदिवशीय धरणे आंदोलनात जिल्हा  ग्रामसेवक युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष, दिलीप ताकसांडे जिल्हा सहसचिव संजीव ठाकरे , जिल्हातील ग्रामसेवक  कार्यकारिणी, सर्व ग्रामसेवक, ग्राम अधिकारी आदी सहभागी झाले होते. 
2011 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढविण्यात यावे, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी वेतन त्रृटी दूर कराव्यात, 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, ग्रामसेवकांकडील  अतिरिक्त कामे कमी करण्यात यावी, एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करताना 20 ग्रा. पं. मागे विस्तार अधिकारी मंजूरी मिळावी, नरेगा करता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनकडून हे आंदोलन करण्यात आले. 
ग्रामसेवक युनियनकडून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलनाचे टप्पे ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये जि. प., विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन, पालकमंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व त्यानंतर मुख्यमंत्री यांची भेट घेत निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 22 ऑगस्टपासून राज्यभर कामबंद आंदोलन कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष  दिलीप ताकसांडे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!