चिमूर तालुक्यातील संगणक परिचालकानी उपसले कामबंद आंदोलनाचे हत्यार ग्राम पंचायत झाल्या ऑफलाईन
चिमूर तालुक्यातील संगणक परिचालकानी उपसले कामबंद आंदोलनाचे हत्यार
ग्राम पंचायत झाल्या ऑफलाईन
मुख्य मागण्या
संगणक परिचालकांचे स्थगित मानधन त्वरित मिळणे
आय. टी महामंडळ मार्फत नियुक्ती तात्काळ देण्यात यावी
ज्या ग्राम पंचायत नि rtgs मारले नाही त्यांनी मारायला बादय करणे मारीत नसल्यास त्या वर कारवाही करणे
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
चिमूर:- संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावा गावात डिजिटल इंडिया चे काम ऑनलाइन करुन शासनाला नं १ वर पुरस्कार मिळवुन देणारे ग्राम पंचायत केंद्र चालक मात्र १०/१२ महिन्यापासून पगारा विना बेहाल झाला आहे तसेच त्याचा पारिवारिक जीवनाचा गाडा मात्र स्तब्ध झाला आहे .
२६ डिसेंबर रोजी अधिवेशन चालू असताना केंद्र चालकाने मुंबई अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला तेव्हा शासनाने आय. टी महामंडळत सामावुन घेण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी मा. उद्धव ठाकरे साहेब सुद्धा याबद्दल या विषयावर मार्ग काढत आश्वासन दिले होते मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही
तालुक्यातील काही गरम पंचायत नि rtgs मारले तर काहींनी अजूनही मारले नाही ,ज्या अजून पर्यंत rtgs मारले नाही त्या ग्राम पंचायत वर कारवाही करणे,महाराष्ट शासनाने संगणक परिचालक अन्याय केला असून शासनाच्या चुकीमुळे काम बंद करायला भाग पाडीत आहे,प्रत्येक ग्राम पंचायत ला डिव्हाईस खरेदी करण्यात यावा,व ups खरेदी करण्यात यावा,
असल्या रास्त मागण्या घेहून चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत मधील संगणक परिचालक यांनी दिर्घ काळ काम बंद आंदोलन करणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे तरी शासनाने ग्रामपंचायत सेवा स्थगित न करता केंद्र चालक यांना न्याय द्यावा व मागण्या मान्य कराव्या असल्या मागण्या घेऊन चिमूर मधील ग्राम पंचायत केंद्र चालकाने काम बंद आंदोलन चे अस्त्र उपसले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!