दहीहंडी कार्यक्रम
दही हंडीतून उंच शिखर कसे गाठायचे हे शिकता येते.
माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
सिरोंचा( सेवा पवार)
जन्माष्टमीत भव्य दहीहंडी
माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले थाटात उदघाटन
बबलू भैय्या व शाहीन भाभी हकीम यांनी प्रोत्साहनपर बक्षिसे दिले.
डीजेच्या आणि पावसाच्या सरीत युवक मनसोक्त नाचून आनंद लुटले!दही हंडी आणि मटकी फोडीतून जिवनात उंच शिखरावर कसे पोहचायचे हे शिकता येते असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते शनिवार 24 आगष्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव कान्हा मटकी फोड महिला मंडळ,सिरोंचाच्या वतीने पटवारी कॉलनीच्या प्रांगणात आयोजित भव्य दही हंडी मटका फोड कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या उदघाटनस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम होते.तर मंचावर विशेष अतिथी म्हणून बबलू भैय्या हकीम, शाहीन भाभी हकीम, प्रा.नरेंद्र मरसकोल्हे, अर्चना मरसकोल्हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगर सेवक नागेश्वर गागापूरवार, शैलेश पटवर्धन, रा.काँ.चे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कल्लूरी, एम.डी.शानु, नगर सेवक बबलू भाई, सरोजिनी मगिडी, विजय तोकला, फाजील पाशा,उज्वल तिवारी, सत्यम चिलकामारी, कार्तिक मेश्राम, रेखा तिपटीवार,सुरेश पडगेला आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, जिवनात यशोशिखरावर पोहचण्यासाठी प्रत्येकांनी दही हंडी व मटका फोड सारख्या स्पर्धेत भाग घेणे अत्यावश्यक आहे कारण यातून आपण उंचावर मटका फोडण्यासाठी कौशल्य व कसरत आत्मसाद करून यशोशिखरावर कसे गाठायचे हे शिकता येते असे म्हणत युवकांना जोश व स्फूर्तिदायक मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी, दही हंडी- मटका फोड कार्यक्रमाचे विधिवत पूजन आणि नारळ फोडून शाही थाटात उदघाटन केले.
दही हंडी व मटका फोड सुरू असतांना पावसाच्या सरी सुरू होते त्यामुळे युवकांनी डीजेच्या तालावर मनसोक्त नाच गाणे करून दही हंडी कार्यक्रमात आनंद लुटले.
विर मराठा संघ सिरोंचा यांनी अनुक्रमे प्रथम तर जय बजरंग दल संघ, सिरोंचा यांनी द्वितीय क्रमांक पटकाविले. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून वीर मराठा संघ दही हंडी फोड कार्यक्रमात अव्वल ठरत आहे, यंदाही प्रथम येण्याचे मानकरी ठरले आहे. मराठा संघाचे कर्णधारपद अर्थात प्रतिनिधित्व रणजित गागापूरवार करीत आहेत.
श्रीकृष्ण जन्माष्टमी, दही हंडी कार्यक्रमात माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम यांच्या तर्फे १३,५०० रु.रोख तर द्वितीय स्व. महाराज परसा यांच्या स्मृती प्रित्यर्थ आकाश परसा यांच्या तर्फे पाच हजार रु. रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यात बबलू भैय्या हकीम व शाहीन भाभी हकीम यांनी प्रत्येकी एकेक हजाराचे प्रोत्साहन पर बक्षिस दिले.
विजेत्या संघांना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम, भाग्यश्रीताई आत्राम, बबलू भैय्या हकीम, शाहीन भाभी हकीम यांनी आपल्या शुभहस्ते पुरस्काराचे रोख रक्कम देऊन संघांना गौरविले.
परीक्षक म्हणून शिक्षक सोनेकर व मादेशी यांनी काम सांभाळले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!