२६ ऑगस्ट ला भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये तर द्वितीय बक्षीस २१ हजार रुपये

२६ ऑगस्ट ला भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
 
प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये तर द्वितीय बक्षीस २१ हजार रुपये 


कार्यक्रमाला विशेष उपस्थिती अभिनेत्री नेहा पेंडसे


चिमूर -  प्रतिनिधी  ( विलास मोहिनकर )


चिमूर : - स्व.गोटूलालजी भांगडीया व स्व.धापूदेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टी तसेच आमदार बंटीभाऊ भांगडीया मित्र  परिवार चिमूर विधानसभा यांच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन दिनांक.२६ ऑगस्ट ला करण्यात आलेले आहे .
   स्व.गोटूलाल भांगडीया व स्व.धापूदेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ भाजप व आमदार बंटीभाऊ भांगडीया मित्र परिवार चिमूर विधानसभा क्षेत्र च्या वतीने दिनांक २६ आगस्ट ला दुपरी ०३:००  वाजता नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूर च्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेली असून प्रथम बक्षीस रोख ३१००० रुपये तर द्वितीय बक्षीस २१००० हजार रुपये आहे. या दहीहंडी स्पर्धेचे प्रमुख अतिथी माजी आमदार मितेशजी भांगडीया ,आमदार किर्तीकुमार भांगडीया तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे . या दहीहंडी स्पर्धेत दहीहंडी मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बंटी वनकर ,गोलू भरडकर, श्रेयस लाखे, पराग अंबादे, नैणेश  पटेल ,गजू राऊत, अमित जुमडे ,सचिन डाहुले ,सैफ शेख अमीन खान ,निखिल भुते, सावन गाडगे, गोलू मालोदे उत्कर्ष मोटघरे , सौरभ बडगे अरबाज खान व आदी युवा कार्यकर्त्यांनी केलेले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!