कांग्रेस च्या महापर्दाफाश रॅलीत भा ज प वर प्रहार.

विकास झाला तर महाजनादेश यात्रा कशाला?

          माजी खासदार नाना पटोले.
 
 मुल(प्रकाश चलाख)

 काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज मुल येथे झालेल्या काँग्रेसच्या महा पर्दाफाश रॅलीत भाजपावर आणि स्थानिक भाजप नेत्यावर हमला बोलून कर्जाच्या खाईत लोटणार्‍या सरकारला सत्तेतून हाकलून लावा  असे मत जनसमुदायासमोर व्यक्त केले.


 काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपावर संधान साधून जिल्ह्याचे नेते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून सुरुवात केली .राज्याची तिजोरी खाली करण्यात राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार कारणीभूत असून जिल्ह्याच्या विकासाकडे महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करून गरीब जनतेच्या  पैशाची लूट केली आहे .येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा नेत्याला घरी बसवा अशी विनंती त्यांनी  केली.

 काँग्रेसच्या महा पर्दाफाश रॅली निमित्त  मुलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब  विचारण्यासाठी आलो आहे .दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्याच कर्मभूमीत मुद्दाम आलो आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याची तिजोरी खाली केली. राज्याला कर्जाच्या खाईत लोटले. सिमेंटचे रस्ते, पूल या कामा पलीकडे कोणतीही त्यांनी योजना व कामे राज्यात केली नाही. नफेखोरी, कमिशन खोरी याकडे लक्ष देऊन राज्यातील गरीब जनतेला लुटले आहे. कामाच्या बदल्यात पैसा घेऊन त्या पैशावर ताजमहाल उभा करणे आणि वाढदिवसात कोट्यावधीचा ताजमहाल आपल्या श्रीमतीला भेट देणे .यापलीकडे त्यांनी काहीच केले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 भाजपाने सध्या रेनकोट, छत्री वाटून लोक गोळा करण्याचे काम करीत आहे. महाजनादेश यात्रेला जमा  झालेला  जनसमुदाय हा पैसा देऊन गोळा केलेला होता अशी टिप्पणी त्यांनी जोडली.

 शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना नाना पटोले म्हणाले की पिक विमा योजना  ही नावापुरतीक  आहे .अजून पर्यंत ही पीक विमा योजनेच्या शेतकऱ्यांना पैसा दिला नाही. हा सर्व पैसा अंबानी ,अदानी यांचेकडे वळता करण्यात आला आहे.   शासकीय कार्यालयांना त्यांना विज बिल भरण्याकरता पैसे नाही. बीएसएनएल ला आपल्या कार्यालयाचे विज बिल भरायला साधी रक्कम उपलब्ध नाही. या सरकारने जीवोला समोर आणून इतर कंपन्यांना बंद करण्याचा कुटील डाव रचला आहे.

 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना  सत्तेवर आल्यास छत्तीसगड राज्याच्या  धर्तीवर आम्ही येथील धान खरेदी करू अशी ग्वाही  शेतकऱ्यांना दिली. सध्या मध्य प्रदेश सरकार शंभर युनिटचे शंभर रुपये वीजबिल घेत आहे. उलट राज्यातील फडणवीस सरकार 100 युनिट चे  हजार रुपयाचे वर  घेत असून वीज ग्राहकांची सरकारने थट्टा चालवली आहे.

  2014 मध्ये राज्यावर   दीड कोटी कर्ज होते. आज ते कर्ज पाच लाख कोटी एवढी झाले आहे.सरकार कमजोर स्थितीत असून रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ते स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळ प्रवाशांकडून अतिरिक्त एक रुपया बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना म्हणून वसूल  करते. 13 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात 67 लाख लोक रोज एसटीने प्रवास करतात. अजून पर्यंत कुणालाही या अपघात विम्याचा फायदा मिळाला नाही. सर्व पैसे मातोश्रीवर देत  असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 राज्याला गरिबीच्या खाईत लोटणार्‍या भाजपा सरकारला त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा. असा उपरोधिक टोला नाना पटोले यांनी महापर्दाफाश रॅलीत जन समुदायाला संबोधित करताना केले.


 चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी भाजप  सरकारवर बोलताना लोकविरोधी शासन असल्याचे मत व्यक्त केले. बाळू धानोरकर यांनी दारू बंदी बाबत बोलताना पोलीस प्रशासन सुद्धा सुरक्षित नाही. जिल्ह्यातील दारूबंदी ही सपशेल फेल ठरली आहे. झालेली चूक दुरुस्त करायला पाहिजे असे मत व्यक्त केले. कर्जमाफी चा फायदा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही .ऑर्डनन्स फॅक्टरी  खाजगी  कंपनीच्या हाती देणार असल्यामुळे अनेक बेरोजगार युवक रोजगारापासून वंचित राहणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

 सत्ताधारी शासन है भ्रष्ट असून नोटाबंदी च्या नावावर भाजपा नेत्यांनी अनेक किमया जमवली असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदी नंतर 750 कोटी रुपये अमित शहा यांच्या बँकेत आले कसे ?याचे उत्तर त्यांनी स्पष्ट करावे. सरकार  महाजणांचा, वाडे वाल्यांचा आहे. गरिबांचा नाही.  हिटलरशाही सुरू असून सीबीआई  इडीचा धाक दाखवणाऱ्या नेत्यांना हाकलून लावा असे मत व्यक्त केले.

 जिल्ह्यात काँग्रेसच्या बाबतीत बोलताना त्यांनी भाजपा नेत्यांनी काँग्रेसला बदनाम करण्यापलीकडे काही केले नाही. सुभाष धोटे यांचे उदाहरण देऊन त्यांच्याविरोधात काँग्रेसला बदनाम करून भाजपा जिल्ह्यात खेळी करीत असून काँग्रेसला बदनाम करीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा असे मत मांडले.

 काँग्रेसच्या महापपर्दाफाश रॅलीत बोलताना  माजी आमदार देवराव भांडेकर यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आना अशी कळकळीची विनंती जनसमुदायासमोर व्यक्त केली. तर काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष रावत यांनी सर्व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने, एकजुटीने  काम करून काँग्रेसला व काँग्रेसच्या उमेदवाराला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरगोस मताने  विजय करावे असे मत व्यक्त केले .

 "मुल येथील सामाजिक कार्यकर्ते  गौरव शामकुळे यांनी आज काँग्रेसच्या कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने तरुणांची फडी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे."

 काँग्रेसच्या महा पर्दाफाश रॅलीत गडचिरोलीचे आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी,संजय मारकवार ,विनोद अहिरकर यांनी संबोधित केले.

 मंचावर काँग्रेसचे डॉक्टर सतीश  वा रजुरकर, विनोद द ता त्र य चित्रा डांगे, राकेश  रत्नावर, घनश्याम येनूरकर, विनोद अहिरकर, वैशाली पुलावा र ,प्रकाश मारकवार  कार्यकर्ते व इतर गणमान्य नेते उपस्थित होते.
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!