पोळा - सर्जा राज्या चा सण

पोळा - सर्जा राज्या चा सण


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दिनांक ३०/०८/२०१९  पोळा या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. ग्रामीण भागातील मौजा पळसगावाच्या फ़ुले चौकात (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, , ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या'(पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात सन्मान मान आहे तो-गावचा गडी) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास 'बैलपोळा' असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर जास्त आहे. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. असल्या तरेन गावात या सणाला एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!