भद्रावतीत ग्रामगीता परीक्षेचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार संपन्न

भद्रावतीत ग्रामगीता परीक्षेचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा  सत्कार संपन्न  

मानवसेवा शुध्दभावाने करा - वाणिभूषण  प्रकाश वाघ महाराज 


भद्रावती (प्रतिनिधी ) - राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या विचाराने आपल्याला नवे जीवन मिळाले असून याच विचाराने देशाला  स्वातंत्र्य  प्राप्त झाले आहे.राष्ट्रसंतानी त्याकाळात अनेक साधुसंत मंडळीचे मन परिवर्तन करून मानवतेचे महान कार्य  केले. त्या विचारानुरूप मानवसेवा  हीच ईश्वर सेवा मानून  ती शुध्दभावाने केली पाहिजे, असे प्रतिपादन सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज यांनी केले. अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या   ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय श्रीगुरूदेव कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन येत्या रविवारी भद्रावती येथील साई मंगल कार्यालयात करण्यात आले होते . उदघाटन  सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज यांच्या हस्ते झाले .


अध्यक्षस्थानी , प्रचार प्रमुख दामोधर पाटील गुरूजी होते . परीक्षा विभागाचे केंद्रीय  सचिव गुलाबदादा खवसे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे ,  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , मंडळाचे संयोजक चंद्रकांत गुंडावार ,  कीर्तनकार प्रा. अशोक चरडे , संघटक प्रेमलाल पारधी, ज्येष्ठ प्रचारक जगन्नाथ गांवडे,  विठ्ठल सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते . प्रास्तविक तालुकाप्रमुख विशाल गांवडे यांनी केले तर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मेळाव्याला भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्यात . याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले ,  ग्रामगीता परीक्षेचे काम करणारे प्रचारक  हे आजच्या काळातले ख-या अर्थाने ज्ञानदूत आहे . गुलाब खवसे आणि पाटील गुरूजीनी परीक्षेचे कार्य करणाऱ्या मंडळीचे कौतुक करून राष्ट्रसंताचे विचार तळागाळात पोहचवा असे आवाहन केले. जिल्हातील ग्रामगीता परीक्षेचे उत्तम कार्य करणाऱ्या केंद्रप्रमुख , प्रचारक  मान्यवरांचा गौरव करण्यात आला.ज्येष्ठ प्रचारक   जगन्नाथ गांवडे ,  मोहनदास मेश्राम , विजय चिताडे , अनिल पिट्टलवार , नामदेव पिज्दूरकर,कार्तीक चरडे ,प्रा.बानासूरे ,प्रेमदास मेंढूलकर ,प्रा.मोरे , शरद सहारे, हुसेन किनाके, शैलेश कावळे, रंगराव पवार, सौ. हुलके , श्रीमती बुरडकर  आदी मंडळीचा सत्कार करण्यात आला.  विचारपीठावर ओमप्रकाश पांडे, बालाजी नागपूरे , केशवानंद मेश्राम , निलीमा वासेकर , मंदाताई उपगंलावार , सौ. विजया दहेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गुणवंत कुत्तरमारे यांनी केले तर आभार  कालिदास चेडे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी एम.पी.कोरेवार , झनक चौधरी , अतुल खापणे,मुर्लीधर मेश्राम , रमेश धाबेकर  , अशोक गौरकार ,  गजानन डंभारे, प्रकाश पिंपळकर , विवेक महाकाळकर , गोपिचंद मेश्राम , सतिश वरारकर , नरेंद्र मेश्राम , बाबाराव तेलरांधे ,तसेच सर्व स्रीपुरूष सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रवंदनेनी मेळाव्याची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!