प्रभाग क्रमांक.५,८,११,१२,१३,१७ मध्ये विविध कामांचे भूमिपूजन चिमुर नगर परिषदेचे अध्यक्ष गोपालजी झाडे यांचे हस्ते सम्पन्न
प्रभाग क्रमांक.५,८,११,१२,१३,१७ मध्ये विविध कामांचे भूमिपूजन चिमुर नगर परिषदेचे अध्यक्ष गोपालजी झाडे यांचे हस्ते सम्पन्न
चिमूर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - दिनांक.१०/०३/२०१९ रोज रविवार ला नगर परिषद चिमुर येथे सन २०१७/१८ नगरउत्थान विकास निधी अंतर्गत (अंदाजे किंमत ४२,०००००/-) प्रभाग क्रमांक १०,११,१४ व प्रभाग क्रमांक ०५ मध्ये दलितोत्तर निधी अंतर्गत प्राप्त निधीतून (अंदाजे किंमत ३८,८४,८९०/-) आणि नागरीसुविधा निधी (अंदाजे किंमत ५३,०००००/-) प्रभाग क्रमांक ५,८,११,१२,१३,१७ मध्ये विविध कामांचे भूमिपूजन चिमुर नगर परिषदेचे अध्यक्ष गोपालजी झाडे यांचे हस्ते सम्पन्न झाले.
यावेळी तुषार शिंदे उपाध्यक्ष न.प.चिमुर , कदिर चाचा गटनेता ,अरुण दुधनकर नगरसेवक , उमेश हिंगे नगर सेवक , विनोद ढाकुनकर नगर सेवक , श्रद्धा बंडे नगर सेविका , जयश्री निवटे नगर सेविका , कल्पना इंदूरकर नगर सेविका , राजुभाऊ चौधरी उपाध्यक्ष ता.कॉ.कमिटी , सुधीर जुमडे सचिव ता.कॉ. कमिटी , प्रदिप बंडे , वनिता मगरे अध्यक्ष चिमुर ता.यु.कॉ.कमिटी प्रकाश वाकडे , सोमेश्वर पतरंगे , व इतर मान्यवर उपस्तिथ होते.

