बैल धुतांना शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

बैल धुतांना शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू


अमृत दंडवते/सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील उमरवाही गावातील मृतक नाव  उत्तम रामदास मसराम , वय ३५ वर्षे रा.उमरवाही तालुका  सिंदेवाही  रहिवाशी असून हा सकाळी घरून रोजच्या प्रमाणे बैल व  गोरा  घेऊन  शेताकडे  चाराला निघाला तेथे शेताकडे असलेल्या  उमा नदी  पात्रात (पाण्यात) बैल  धुवायला गेला असता    खोलवर पाण्यात  गेल्याने त्या नदीच्या पाण्यात उत्तम रामदास मसराम   याच्या बुडून मृत्यू झाला . अशी माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशन ला मिळताच लगेच तपास चालू केला असता तेथे त्यांना घटनास्थळी नदीच्या काठावर  मृतकांचे चप्पल व कपडे काठावर दिसून आले .आणि उत्तम  मसराम त्याचे शव त्या नदीच्या पाण्यात  दिसले. मृतक उत्तम मसराम याची शव  पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी  ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही  नेण्यात आले .व सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल केला. असून  174 जा.पो. कलम लावण्यात आले. व पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहे.