विविध विकासकामांचे सभापतीं च्या हस्ते भूमिपूजन.

मुल (प्रकाश चलाख)
तालुक्यातील हळदी येथे आज मुल प स सभापती पूजा डोहणे यांचे हस्ते विविध कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. झालेल्या कार्यक्रमात आपल्या निर्वाचन क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
क्षेत्राचे लोकप्रिय झुंजार नेते सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री यांच्या विकास कामाच्या निधीतून हळदी येथे
आरो मशीन, एल ईडी पथ दिवे ,सी सी रोड नाली व पेव्हर ब्लॉक्स इ कामे मंजूर करण्यात आली. आज या विकास कामांचे भूमी पूजन मुल प स सभापती पूजा डोहणे यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात सभापती यांनी विकासकामांचा लेखा जोगा मांडताना आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे जाहिर केले.ग्राम पंचायत यांनी मागणी केल्यानंतर आपण त्याचा शासन स्तरावर विशेष लक्ष देऊन पाठ पुरावा केला आहे. गावाच्या विकासासाठी कुठलेही राजकारण न करता विकास हा केंद्र बिंदू ठेऊन कामाला शासनस्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केला आहे. क्षेत्राचे लोकप्रिय नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य होत आहे असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
गावातील कामाची ग्रा प ठरावद्वारे मागणी केल्यासआपण त्या कामाला निश्चित पणेप्राधान्य देऊन ते काम पूर्णत्वास नेऊ अशी ग्वाही त्यांनी उपस्थित जनसमुदायास दिली.
कार्यक्रमाला भाजपा नेते चंदू गांगरेडीवार, जीवन चलाख, नारायण गावतुरे ,रमेश वैरागडे, नितेश चलाख, भारत शेंडे, श्रीरंग गावतुरे, मुकरू भोयर, तानाजी गांगरेडीवार व ग्रामस्थ उपस्थित होते.