सावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुलावामा हल्ल्यातील शहिद जवानांना वाहिली श्रद्धांजली
सावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुलावामा हल्ल्यातील शहिद जवानांना वाहिली श्रद्धांजली
सावली (प्रविण झोडे)
चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यात सावली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात काश्मिर मधिल पुलावामा जिल्हात आतंकवाद्याच्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या भारतमातेच्या विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरातील पुलवामा या ठिकाणी झालेल्या आंतकवादी भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या भारतमातेच्या या विर सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्याकरीता सभा आयोजित करण्यात आली होती. आयोजीतस्थळी भारत माता की जय घोषाचे नारे लावण्यात आले.दोन मिनिट मौन बालगुण श्रदांजली वाहन्यात आली. भारताच्या प्रतिकृती रांगोळीच्या भोवताल मेनबत्ती लावून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी प्रामुख्याने नगरपंचायत चे नगराध्यक्ष विलास यासलवार, माजी प.स.सभापती मोतीलाल दुधे,उपाध्यक्ष भोगेश्वर मोहूर्ले,पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार,विजय आडेपवार,सोमनाथ वाढई,ए.आर.दुधे,प्रशांत गाडेवार, डॉ. विजय शेंडे, छत्रपती गेडाम,राजेश व्यास,प्रलोभ सुरमवार,छन्नूपाली डोहने,यांचा सह अनेकांनी यावेळी आपल्या मनोगतातून आदरांजली वाहिली.यावेळी सावली शहरातील प्रतिष्ठित नागरिक,नगरसेवक,पत्रकार, देशप्रेमी लहान मोठया बालकासह महिला, पुरुष बहुसंख्य जनता मोठया संख्येने उपस्थित होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!