आदिवासी माना जमातीकडून खासदार नेते चा निषेध

आदिवासी माना जमातीकडून खासदार नेते चा निषेध

आरक्षणास विरोध केल्याचा आरोप

शुभम बारसागडे (नेरी/चिमूर):

चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे २१ जानेवारीला आयोजीत कार्यक्रमात माना जमातीला मिळालेल्या आरक्षणाचा विरोध केल्याचे प्रसिद्धी माध्यमात आले . या बातम्याने आदीवासी माना जमातीमध्ये तिव्र अंसतोष पसरला . याचा उद्रेक होऊन माना जमातीच्या वतीने धरने आंदोलन करण्यात आले . बॅनर ,फलक व खासदार नेते विरोधात घोषणा देण्यात आल्या . उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देऊन अंसतोष व्यक्त करण्यात आले .

         नालुनंगपेन मुठवा कोलासुर पेनंठाना ट्रस्ट गडबोरी येथील गोंड समाज द्वारा राष्ट्रीय गोंडवाना महासम्मेलन तथा गोंड संस्कृती महोत्सव २१ जानेवारीला आयोजीत करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते उद्घाटक म्हणुन बोलत होते .व त्यानी आपल्या मार्गदर्शनात धनगर व माना जमातील आरक्षण मिळू देणार नाही . असे प्रसिद्धी माध्यमात बातम्या प्रसिद्ध करण्यात आले . ह्या बातम्या सोशल मिडीयाद्वारा सर्व आदीवासी माना जमातीमध्ये प्रसारीत झाल्याने माना जमाती मध्ये तिव्र अंसतोष पसरला . त्यामुळे माना जमातीला मिळालेल्या संविधानीक आधिकारा विरोधात बोलणाऱ्या खासदार अशोक नेते यांचा निषेध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले .

      धरने आंदोलना करीता  हुतात्मा स्मारक येथुन दुपारी २ .०० च्या दरम्यान सुरुवात करण्यात आली . निषेधाचे फलक व घोषणा द्वारे खासदार नेते यांचा निषेध करण्यात आला . संविधानाची शपथ घेऊन संसदेत जाणाऱ्या खासदारांनी माना जमातीला संविधानाने सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेल्या अधिकारा विरोधात कसे बोलतात , व असे वक्तव्य करून त्यांनी संविधान व न्याय व्यवस्थेचा अपमान केला आहे . खासदारांचा जाती जातीत तेढ निर्माण करून निवडणुकीच्या पुढे दंगली घडविण्याचा कट असल्याचा संशय उप विभागीय अधिकाऱ्यास दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आला . असे असेवधांनीक व्यक्तव्य करणाऱ्या अशोक नेते यांना धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त करीत २ फरवरी पर्यंत खासदार नेते यांनी माना जमातीची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात पोलीसांत तक्रार दाखल करण्यात येईल व होणाऱ्या उद्रेकास ते स्वतः जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला .

       माना जमातीच्या निषेध आंदोलना दरम्यान उप विभागीय अधिकारी भैयासाहेब बेहेर यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी पंचायत समीती उप सभापती शांताराम सेलवटकर , राहुल दडमल , अमोल झाडे , देवराव नन्नावरे , कुलदिप श्रीरामे , अरविंद सांदेकर ,निकेश श्रीरामे , रामदास चौधरी , सुखदेव ढोणे व संदिप खडसंग उपस्थीत होते . सामुहीक नेतृत्व लाभलेल्या या धरने आंदोलनात आदीवासी माना जमातीचे समाज बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते .

----------------------------------------

धनगर ' माना समाजा संदर्भात चुकीच व्यक्तव्य मी केलेले नाही. माना समाजाला आधीच कोर्टाने संरक्षण दिलेलं आहे.  धनगर समाजासन्बन्धी मुख्यमंत्री आदिवासींना धक्का न लावता ह्यावर निर्णय घेतील अशी भूमिका त्यानी स्पष्ट केलेली आहे . विरोधकांनी माझ्या संदर्भात चुकीचा संदेश व्हायरल करून बदनामी करण्याचे  षडयंत्र रचले आहे. 

  

खा. अशोक नेते 

चिमूर ' गडचिरोली लोकसभा क्षेत्र.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!