श्रीगुरूदेव सेवा पुरस्काराने संजिव पोडे सन्मानित

श्रीगुरूदेव सेवा पुरस्काराने संजिव पोडे सन्मानित 

चंद्रपूर (प्रतिनिधी ) - राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा  दिवंगत समाजसेवी गंगाधरराव घोडमारे स्मृती श्रीगुरूदेव सेवा पुरस्कार माजरी (वस्ती) श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष संजिव पोडे यांना प्रदान करण्यात आला. विरूर ( स्टेशन ) येथे आयोजित सेवा मंडळाच्या कार्यक्रमात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते मानपत्र , स्मृतीचिन्ह व रोख देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संघटक शैलेश कावळे, मुख्याध्यापक लटारू मत्ते , दादाजी झाडे, देवराव निब्रड ,सरपंच कु. भाग्यश्री आत्राम आदी मान्यवरांची उपस्थिती होती . 

 संजिव पोडे हे माजरी( वस्ती ) श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेचे अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षापासून आपले  आजोबा दिवंगत चिमनाबाबू झाडे यांचेकडून प्रेरणा घेत  श्रीगुरूदेव कार्याचा वसा चालवित आहे. 

 पुरस्कार मिळाल्याबद्दल संजिव पोडे यांचे मधुसुदन दोनोडे, डाॕ. कुंभारे, ॲड. जेनेकर,  प्रा.बानासुरे, विलास दशमुखे , महेश सावलानी , चंदू पाथोडे, संजय वैद्य आदींनी अभिनंदन केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!