मुद्रा लोनसंदर्भात मूल तालुका पिछाडीवर .

मुद्रा लोनसंदर्भात तालुका पिछाडीवर .


मुल( प्रकाश चलाख)

सुशिक्षित बेरोजगार ,व्यावसायिक यांना आर्थिक दिलासा देणारा मुद्रा लोन तालुक्यात राबविण्यात अनेक बँका उदासीन असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.


केंद्र सरकारची मुद्रा लोन ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दि. 8 एप्रिल 2015 ला दिल्ली येथे सुरुवात केली.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची तीन गटात विभागणी असून आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर सुशिक्षित बेरोजगार,व्यावसायिक याना मुद्रा  लोन देऊन आर्थिक विकास, वृद्धी करणे हा योजने मागचा उदेश आहे. सर्व राज्यांना वरील योजना राबविण्याचे निर्देश  आहे.
गरजू, होतकरू नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे.  परंतु तालुक्यात अनेक बँका या योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार ,व्यावसायिक यांना कर्ज देण्यास उदासीन असल्याचे वृत्त आहे .
मुल तालुका हा मा. सुधीर मुनगंटीवारअर्थमंत्री यांचा बालेकिल्ला आहे. या तालुक्यात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने अनेक प्रलंबित कामे मार्गी लागलेली असून नवीन प्रस्तावित कामे प्रगतीपथावर आहेत.सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्यास सक्षम असून तालुका विकासाच्या बाबतीत अग्रेसर आहे .त्यांच्या पुढाकाराने तालुक्यातील प्रत्येक गावाचा चेहरामोहरा बदलला असल्याचे चित्र आहे .सध्या मुल तालुका" स्मार्ट सिटी" म्हणून नावारुपास येत असताना तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार ,व्यावसायिक मुद्रा लोन पासून वंचित असून तालुक्यातील अनेक बँका मुद्रा लोन देण्यास  असहमती दर्शवितात असे अनेक तरुण बेरोजगार युवक, व्यवसायिक यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील अनेक बँकांकडे मुद्रा लोन वाटप केल्याची साधी आकडेवारी सुद्धा उपलब्ध नसून बरेच लाभार्थी युवकांचे कित्येक वर्षापासून दिलेले अर्ज बॅंकेत धूळखात पडून असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील बँकेचे आहे.
 अनेक सुशिक्षित बेरोजगार लोकांचे मुद्रा लोन प्रकरण निकाली काढण्यात बँका अयशस्वी ठरत असून योजनेला तालुक्यात घरघर लागल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुद्रा लोन योजना सुशिक्षित बेरोजगार, व्यवसाय यांच्यासाठी असताना बँका  सहकार्य करीत नसतील तर या योजनेचा फायदा काय?असा संतप्त सवाल तालुक्यातील अनेक गावातील सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक यांचा  आहे .
तालुक्यात मुद्रा लोन संदर्भात अधिक जनजागृती व्हावी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेचा फायदा व्हावा करिता मुद्रा लोणला अधिक गती द्यावी अशी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार ,व्यावसायिक यांची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!