आप तर्फे उद्योग उभारणी चळवळीची सुरुवात
टोम्याटो सॉस च्या यशस्वी प्रकल्पानंतर आप तर्फे उद्योग उभारणी चळवळीची सुरुवात
शुभम बारसागडे (नेरी/चिमूर):
सुशिक्षित बेरोजगारांच्या वाढत्या समस्येवर ठोस निर्णय घेवून आम आदमी पार्टी तर्फे प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभा क्षेत्रात उद्योग उभारणी चळवळीची सुरुवात करण्यात येत आहे. याआधी महिला व युवकांना आप तर्फे टोम्याटो सॉस या उद्योगावर मार्गदर्शन तसेच उद्योग उभारण्यास मदत करण्यात आली होती, या उद्योगाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा वापर करून कमीत कमी खर्चात चालू होणारे व जास्त नफा कमावून देणारया अनेक लघु उद्योगांवर प्रशिक्षण देण्याची चळवळ राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इच्छुकांना उद्योग चालू करून देण्यासाठी आम आदमी पार्टी तर्फे मदत करण्यात येयील, तसेच उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्याकरिता मार्गदर्शन व मदत करण्यात येत आहे.
या चळवळी दरम्यान दि. २७ जानेवारी ला नेरी आणि शंकरपूर येथे सोलर उद्योग, ३१ जानेवारी ला चिमूर येथे केसांपासून अमिनो आम्ल, दि. १० फेब्रुवारी ला नागभीड व तळोधी येथे टोम्याटो सॉस व फूड उद्योग, दि. १७ फेब्रुवारी ला नेरी, चिमूर येथे डीटेर्र्जेंट, टोयलेट क्लीनर तसेच दि. २४ फेब्रुवारी ला नागभीड, तळोधी येथे वाती उद्योगावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उद्योग उभारणी चळवळीचा सुशिक्षित युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आप चे नागभीड तालुका अध्यक्ष श्री सुरेशजी कोल्हे, चिमूर तालुका अध्यक्ष प्रा. माधवजी पिसे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!