ग्राम पंचायत हिरापुर मधील डिव्हिडीएफ च्या मंगल कार्यालयाच्या बांधकाम मूल्यकनापूर्वीच काढले १० लाख रुपये...

ग्राम पंचायत हिरापुर मधील डिव्हिडीएफ च्या मंगल कार्यालयाच्या बांधकाम मूल्यकनापूर्वीच काढले १० लाख रुपये...
ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची ग्राम पंचायत सदस्यांची मागणी 

शंकरपूर (जगदिश पेेंदाम):- 
     चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत हिरापुर येथे ग्रामसेवक पदावर सिं.एन. पाटील हे कार्यरत असून त्यांचे कडे ग्राम पंचायत शंकरपूर चा प्रभार आहे डिव्हिडीएफ फंडातून ग्राम पंचायत ला मंगल कार्यालय बांधकाम साठी ७५ लाख रुपये मंजूर झाले असून बांधकाम सुरू होण्या आधीच सरपंच व ग्राम सेवक यांनी संगनमत करून आलेल्या निधीतून १० लाख रुपयांची उचल केल्याचा प्रकार उजेडात आला असून अनागोंदी व अनियमितता कारभाराची चौकशी करून ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य पिताजी बावनकर,महेंद्र पंचवटे व  विलास बघिले यांनी केली आहे. 
     ग्राम पंचायत हिरापुर मध्ये ९ सदस्य असून सरपंच अंजना घोडमारे  व ग्रामसेवक सी.एन. पाटील आहेत हिरापुर गावाच्या विकासाठी जी. प. चंद्रपूर  मधून डिव्हिडीएफ निधीतून  मंगल कार्यलयाचे बांधकाम करण्यासाठी ७५ लाख रुपये मंजूर झाले असून बांधकाम करण्यासाठी ग्राम पंचायत ला ५६ लाख २५ हजार रुपये जमा झाले हि रक्कम ६ महिण्यापूर्वीच जमा झाली  मटेरिअल सप्लायर ची निविदा काढली असता बांधकामाची ई-निविदा काढली नाही तरीही संबंधित ठेकेदारास काम मिळाले जून/२०१७ ला निधी जमा झाली. मंगल कार्यलयाचे  मूल्यकन  करण्या पूर्वीच सरपंच व ग्रामसेवक यांनी १० लाख रुपयांची निधी उचल केली. फक्त ले-आऊट टाकल्या नंतरच १० लाख रुपये काढले  निधी ची उचल करताना कोणत्याही ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेतले नाही ग्रामसेवक व सरपंच यांचा संगनमताने सदर रक्कम काढण्यात आली. आजच्या घडीला केवळ अंदाजित ५ लाख रुपयांचे बांधकाम झाले असावे असे असताना १० लाख रुपये हे झिरो मूल्यकन असताना काढले कसे हा प्रश्न निर्माण झाला असून या कामात मोठा भष्ट्राचार झालेला आहे. ग्रामसेवक हे ग्राम पंचायत चे बँकेचे पासबुक दाखविण्यासाठी टाळटाळ करीत आहे ते केवळ एक किंवा दोनदाच हिरापुरला येत असतात त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
    ग्राम पंचायत हिरापुरच्या डिव्हिडीएफ फँडातील मंगल कार्यालयाचे बांधकामा ची चौकशी करून व मूल्यकन पूर्वीच १० लाख रुपये काढले कसे या प्रकाराची तात्काळ चौकशी करून सरपंच व ग्राम सेवक वर कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य पिताजी बावनकर, महेंद्र पंचवटे,विलास बघिले, युवराज राणे, गुफाबाई वाकडे,अस्मिता वाघमारे,व कुसुम हटोलकर यांनी केली असून कारवाई न झाल्यास पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!