चिंतामणी महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
चिंतामणी महा.त स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
पोंभूर्णा (जवाहर धोडरे द्वारा )
ग्रामीण क्षेत्रातील युवतींनी महाविद्यालयीन जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांचा ध्यास धरावा व विविध विभागांचे अधिकारी बनावे. आज महिला ह्या शिक्षण, सुरक्षा, राजनीती, संशोधन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत आहेत तर ग्रामीण क्षेत्रातील महिलांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती कु. अलकाताई आत्राम यांनी केले. ते स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स तथा महिला व बाल कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. टी एफ गुल्हाने यांनी महाविद्यालयातील युवतींनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा व सार्वजनिक वाचनालयाचा स्पर्धा परीक्षांसाठी वापर करावा असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सदस्य गंगाधर मडावी व प्रमुख अतिथी म्हनून असलेले चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभूर्णा चे प्राचार्य डॉ .एन .एच. पठाण यांनी शिबिरार्थ्याना शुभेच्छा दिल्या .सातत्यपूर्ण प्रत्यक्ष कृती केल्यानेच यश मिळेल असे वक्तव्य सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी उत्कर्ष वागळे यांनी केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ यांनी प्रास्ताविकाद्वारे शिबिराची माहिती दिली. दिवसभर चाललेल्या शिबिरात चंद्रपूर च्या चाणक्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मोरे सर यांनी राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक, विक्री कर निरीक्षक, अधिकोषण परीक्षा, तथा वर्ग तीन च्या भरती प्रक्रीये संबंधी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!