श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या साहित्य पुरस्काराने बंडोपंत बोढेकर व डाँ . चंद्रकांत लेनगुरे सन्मानित
सिरोली (वार्ताहर) :
श्यामरावबापू कापगते स्मृति प्रतिष्ठान साकोलीचा दिवंगत ताराबाई हरिश्चंद्र बोरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा साहित्य पुरस्कार ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर व डाँ .चंद्रकांत लेनगुरे यांना प्रदान करण्यात आला आहे.महागाव सिरोली येथील श्यामाप्रसाद विद्यालयात आयोजित श्यामरावबापू कापगते जन्मशताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रस्तुत पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी माजी आ.हेमंत पटले, गोंदिया जि.प.अध्यक्ष रचनाताई गहाणे, माजी आ.डाँ .हेमकृष्ण कापगते ,डाँ . गजानन डोंगरवार ,डाँ .हरिश्चंद्र बोरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती . ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर हे जवाहरनगर येथे संपन्न झालेल्या रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.ते झाडीबोलीचे साहित्याचे अभ्यासक ,कवी ,राष्ट्रसंताचे अनुयायी तथा प्रसिद्ध वक्ते म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या १५ वर्षांपासून बोली चळवळीशी ते जुळलेले असून त्यांचा ग्रामगुरू लेखसंग्रह ,झाडीबोली चळवळीचे सिंहावलोकन ,खंजेरी झाडीबोली काव्यसंग्रह तसेच नक्षत्राची काव्यबाग ,नक्षत्राची काव्यफुले ही प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित आहे. ते विविध साहित्य संमेलनात ,झाडीबोली शाखाविस्तार,शाखापुनर्गठन ,परिसंवाद ,कार्यशाळा तसेच विविध वर्तमानपत्रात समीक्षणात्मक स्तंभ लेखन आदी कार्यात त्यांनी आजवर विशेष योगदान दिलेले आहे. तसेच कवी डाँ .चंद्रकांत लेनगुरे हे गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष असून त्यांचेही चार ग्रंथ प्रकाशित आहे. पुरस्काराबद्दल हिरामण लांजे ,सौ.अंजनाबाई खूणे,आश्विन खांडेकर,पवन पाथोडे आदींनी अभिनंदन केलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!