मृतक महिलेचा मृत्यूदेह पोलीस चौकीत


शंकरपूर(जगदीश पेंदाम) :-
सहा दिवसापूर्वी झालेल्या अपघातात जखमी महिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान सकाळी ४ वाजता मृत्यू झाला. मृत पावलेल्या पार्वता कवडू चौधरी वय ६५ वर्षें हीचा मृतदेह  शंकरपुर येथील पोलीस चौकीत  आणून ठेवल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की, २२ जानेवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास मृतक पार्वता चौधरी ही भाजीपाल्याच्या पिशव्या घेऊन घराकडे जात होती. त्या दरम्यान येथील शिवाजी चौकात समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली यात पार्वता चौधरी, दुचाकीचालक मनोज सुखदेव मेश्राम व सोबती अश्विन बापूराव शेंडे जखमी झाले. त्यांना शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले मात्र पार्वता चौधरी हिला गंभीर दुखापत झाल्याने तिला नागपूर येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले.आज पहाटे ४ च्या सुमारास मृत पावल्या.

1 टिप्पणी:

  1. पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांचा गैरजीम्मेदार पणा पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी तसेच नागरिकांसमोर उघडकीस आणणाऱ्या विद्यार्थ्यांचा व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, विदर्भ (नगर शाखा-शंकरपूर) यांचा प्रथम पुढाकार होता.

    या बाबींचा उल्लेख होणे गरजेचे...

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!