वैज्ञानिक दृष्टिकोन हेच अंधश्रद्धा दूर करू शकते त्यामुळे विज्ञानाची कास धरावी - प्रा. हरिभाऊ पाथोडे
सावली - चांदली बुज. येथे व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा व स्वच्छ गांव या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा, बुवाबाजी यावर परखड मत व्यक्त करीत विज्ञानाची कास धरावी असे मत प्रा. हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील चांदली बुज. या गावात लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा, गावातील अवैध दारू, अस्वछता यावर जनजागृती करण्यासाठी पं. स. विजय कोरेवार यांचे कल्पनेतून "व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा व स्वच्छ गांव" या विषयावर ग्रामपंचायत व तंटामुक्ती यांचे वतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संयोजक प्रा. हरिभाऊ पाथोडे यांनी प्रात्यक्षिकाचे माध्यमातून बुवाबाजीवर प्रहार केला. पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार यांनी दारूचे दुष्परिणामावर मार्गदर्शन करीत दारूबंदीसाठी युवकांनी, महिलांनी समोर येण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!