राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणार

मूल (प्रतिनिधी):-
गिरीश महाजन यांनी शहादा येथे महिला विरोधी भाष्य केले आणि दारू ला महिलांची नावे दया असे विधान केल्यानंतर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अड.पारोमिता गोस्वामी यांनी मूल पोलिसात महाजन विरुद्ध तक्रार दाखल केली होती.  दाखल केलेल्या  तक्रारींवर मूल पोलिसांनी कोणतीही कारवाही न केल्याची गंभिर दखल राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा विजया रहाटकर याबाबत  मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहेत शिवाय मूल पोलिसांना विचारणा करणार आहेत.
काल एका दुरचित्रवाहिनी वरील चर्चेत संस्थेच्या अध्यक्षा अड. पारोमिता गोस्वामी यांनी महिलांचा एवढा धडधडीत अपमान झाल्याची तक्रार मूल पोलिसांना दिल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल केला नाही किंवा  अदखलपात्राची नोंद घेतली नाही.
ही बाब पुढे आणताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत मुखमंत्राशी यावर बोलू व मूल पोलीसांना जाब विचारू असे जाहिर केले.
यासोबतच ज्या दारूचे नाव महिलांच्या नावाने आहे अशी नावे देखील बद्दलवणास भाग पाडू असे यावेळी बोलत असताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!