*श्रमिक एल्गारच्या वतीने तिन दिवसीय युवा नेतृत्व विकास शिबिर संपन्न*

   श्रमिक एल्गार च्या वतीने तीन दिवसीय शिबिरीचे आयाेजन करण्यात आले. शिबिराचे उदघाटन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड. पाराेमिता गाेस्वामी यांचे हस्ते  करण्यात आले. युवक,युवतींनी सामाजाचे नेतृत्व करण्याचे गुण अवगत करावे व सामाजिक कार्य करावे यासाठी श्रमिक एल्गार संघटना मागील सतरा वर्षा पासुन  अशा शिबिरातुन नेतृत्व निर्माण करण्याचा कार्य करीत असुन नेतृत्व गुण आपणही अवगत करुन समाजाची सेवा करावी हे उदघाटनाप्रसंगी त्या बाेलत हाेत्या. तसेच शिबिरार्थ्यांना शुभेच्छ्या दिल्या.  तर श्रमिक एल्गार संघटनेचे उपाध्यक्ष मा. विजय सिध्दावार व श्रमिक एल्गारचे केंद्रीय संघटन सचिव डाँ. कल्यान कुमार महासचिव साै. छाया सिडाम यांनी मार्गदर्शन केले. संचालन श्रमिक एल्गारचे महासचिव मा. घनशाम मेश्राम यांनी केले तर आभार अनिल मडावी यांनी मानले.
           तर दुसऱ्या दिवशी शिबिरार्थ्यांना मुल नगर परीषदेचे मुख्याधिकारी मा. सरनाईक साहेब यांनी मार्गदर्शन करत नगरपरीषदेची रचना शिकविली. शिबिरात सिंदेवाही, मुल, नागभिड, चंद्रपुर, बल्लारशहा, राजुरा, पाेंभुर्णा, गाेंडपिपरी, सावली, चामाेर्शी तालुक्यातील युवक, युवती सहभागी झाले हाेते.
शिबिरात ग्रामसभा , पाेलीस कायदा, माहीतीचा अधिकार, साेशल मिडीया, हे विषय प्रामुख्याने शिकविण्यात आले. संघटनेचे केंद्रीय संघटनन सचिव डाँ कल्यान कुमार दाेन तासाचा सत्र घेवुन शिबिरार्थांना महत्वाची माहीती दिली. तसेच संघटनात्मक खेळ शिकविण्यात आले, पाेलीस कायदा शिकवितांना मुल पाेलीस स्टेशनला भेट  देवुन प्रत्यक्ष पाेलीसांची कार्यपद्धत शिबिरार्थी समजुन घेतली. मुल पाेलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा. कुमरे साहेब यांनी कार्यपद्धत समजावुन सांगीतले तर रात्राे विदर्भ राज्यावर आधारीत फिल्म दाखविण्यात आले.
         शिबिरात निबंध स्पर्धा घेवुन बक्षीसं देण्यात आले. शिबिराचे समाराेप शिबिरार्थ्यांचे मनाेगत ऐकुन करण्यात आला.शिबिर प्रमुख म्हणुन श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते विशाल नर्मलवार यांनी जबाबदारी पार पाडली. तर शिबिराच्या यशस्वितेसाठी अमर कड्याम, संगीता गेडाम, सपना कामडी , रवि नैताम, माेनी कुळमेथे, रानी भाेयर, रेश्मा गेडाम, बिंदु गडलिंग, अजय गेडाम, यांनी परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!