सिर्सीत बिबट्याचा हल्ला - बालीकेला उचलून नेले

सावली (सिर्सी)
सावली तालुक्यातील सिर्सी या गावामध्ये आज संध्याकाळी 6 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून जितेंद्र हजारे यांच्या 4 वर्षाच्या मुलीला अंगणात आजीसोबत शेकोटी शेकत असताना उचलून नेले आहे. त्यामुळे गावात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यानंतर गावकऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला आहे मात्र वृत्त लिहेपर्यंत मुलीचा शोध लागलेला नाही आहे.फक्त तिचे रक्ताने माखलेले कपडे मिळाले आहेत .स्थानिक वनविभागाचे अधिकारी,पोलिस व गावकरी मुलीचा शोध घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!