शेतकऱ्यांच्या मागण्या घेवुन वनपरीक्षेत्र कार्यालयावर रजत

*शेतकऱ्यांच्या मागण्या घेवुन श्रमिक एल्गारची वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडक*
          दि ३/११/२०१७
----------------------------------------
श्रमिक एल्गारचा सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माण्यासांठी वनपरीक्षेत्र कार्यालयावर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड. पाराेमिताताई गाेस्वामी यांचे नेतृत्वात माेर्चा काढण्यात आला . मा. वनपरीक्षेत्र अधिकारी गाेंड साहेब यांना निवेदन देण्यात आले मा. गाेंड साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल ही ग्वाही माेर्चेकरुंना दिली. माेर्चात १) रानटी डुकरांपासुन हाेत असलेल्या शेतपिकाची नुकसान भरपाई द्या. २ शेतकऱ्यांना सरपनासाठी ग्रामपंचायत स्तरावर  जळावु लाकुड उपलब्ध करा. ३) वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदाेबस्त करा. ४) सरडपार येथिल बांबुकारागीरांना हिरवा बांबु व  गँस कनेक्शन देण्यात यावे अशा विविध मागण्या घेवुन शिवाजी चाैक ते वनपरीक्षत्र कार्यालयावर धडकला माेर्चात सिंदेवाही तालुक्यातील आंबाेली, पळसगाव, कळमगाव , चिटकी, घाेट, अंतरगाव, विसापुर, नवरगाव, डाेंगरगाव, वानेरी, पवनपार, सरडपार अनेक गावातुन शेतकरी सहभागी झाले हाते.
माेर्चात श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड पाराेमिताताई गोस्वामी यांनी मार्गदर्शन करतांना वनविभागाने तात्काळ रानटी डुकराचा बंदाेबस्त करावा अन्यथा शेतकरी डुकरांचा बंदाेबस्त करेल असा ईशाराही त्यांनी आपल्या भाषनातुन वनविभागाला दिला . मा. विजय सिद्धावार उपाध्यक्ष श्रमिक एल्गार यांनी मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांवर वनविभागाकडुन हाेत असलेला अन्याय संघटना खपवुन घेनार नाही हे ठनकावुन सांगीतले तर श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, जनार्दन उईके, गुलाबजी बुरुले,महासचिव छाया सिडाम,मिलींद मडावी यांची भाषने झाली. संचालन रवि नैताम यांनी केले तर माेर्चाचे यस्वितेसाठी वंदना मांदाडे, अनिल मडावी, संगीता गेडाम अमर कड्याम, सपना कामडी, खुशाल कुमरे, रानी भाेयर   रेश्मा गेडाम व ईतर कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले माेर्चा राष्टगीताने समाप्त करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!