जागतीकरनाच्या धोरणामुळे शिक्षणात अनेक विकृती- नानासो जयवंतराव ठाकरे- अ.भा. स. अ. सभा अधिवेशन- स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या कुंटूबीयांना मरनोत्तर पुरस्कार
शुभम बारसागडे:
नेरी(चिमूर)प्रतीनीधी:
भारतीय घटनेत बालवाडी शिक्षणाची जबाबदारी घेतली असताना संविधानात बदल घडवुन बाल शिक्षणाची जबाबदारी शासनाने टाळली आहे. भारताने गॅट करारावर सह्या केल्या त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली झाली आहे. अर्थव्यवस्था बाजाराधीष्टीत होवून शिक्षण आरोग्य, कृषी, इ. व्यवस्था बाजाराधीष्टीत झाल्या शिक्षणाचे बाजारीकरन झाले. जगातील १२० कोटी गरीबापैकी ४० कोटी गरीब भारतात आहे. या गरीबांच्या मुला - मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था बाजारू शिक्षण व्यवस्थेत होनार नसल्यामुळे त्यांना शिक्षण व्यवस्थेतुन हद्पार व्हावे लागेल आजच्या आपल्या राज्यातील शिक्षण व्यवस्था व शिक्षणासंबधीचे आदेश पहाता सरकारनेच उच्च वर्गीय व उच्च वर्णीयापुर्तेच शिक्षण मर्यादीत केले आहे. त्यामुळे बहुजन समाज शिक्षणाच्या महागाईने शिक्षणापासून लांब जात आहे. शिक्षण ,आरोग्य या सारख्या मानवी जीवनासाठी आवश्यक अशा व्यवस्थामध्ये जागतिकीकरनाच्या आर्थिक धोरनामूळे घातक परीणाम जानवु लागले. त्यामूळे शिक्षणात जागतीकरनाच्या धोरणाने अनेक विकृती निर्माण झाल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!