आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्याला पडले भगदाड सावली सिंचाई विभागाचे दुर्लक्ष

आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्याला पडले भगदाड
सावली सिंचाई विभागाचे दुर्लक्ष
स्वातंत्रपुर्व काळात इंग्रजानी सध्याच्या सावली तालुक्यातील पाथरी या गावापासून अवघ्या १ किलोमिटर अंतरावर जंगल परिसरात टेकड्याना जोडून सन १९०२ मधे तलावाच्या कामाला सुरुवात करुन १९१७ मधे म्हनजे १५ वर्षाच्या अल्पावधीत तलावाचे काम पुर्ण केले . व परीसरातील शेतकर्याना सिंचणाची सोय उपलब्ध करुण दिली . तेव्हापासुन तब्बल १०० वर्षानी भारत सरकारने तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले व सदर काम उर्जा टेक नामक कंपणीला दिले असता उर्जा टेक कंपणीने यंदाच्या उन्हाळ्यात यंत्राद्वारे कामाला सुरुवात केली सदर काम करीत असताना कंपणीच्या हलगर्जीने व सिंचाई विभागाच्या दुर्लक्षाने कालव्याच्या मधो - मध मोठे भगदाड पडुन कालव्यातील पाणी मोरीद्वारे वाहुन जात आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!