मूलचे विकास कामात कासवगती

मूलचे विकास कामात कासवगती
सा.बां. विभागाचे ढिलाईने अपघाताची षक्यता
मूल (दिनेष घाटे)   
    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल षहराच्या विकासासाठी प्रचंड निधी आणून गावचा चेहरा-मोहरा बदलवित आहे, मात्र प्रषासकीय यंत्रणेच्या उदासिन भुमीकेमुळे विकासकामे धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.  मूल गावाला षहराचा लूक देणारा मूल-चंद्रपूर राज्यमार्गाचे रूंदीकरण आणि मजबूत क्रांक्रिटच्या रस्त्याचे कामही मागील दोन वर्शात पूर्ण झाले नाही.  गावातील सर्व रस्ते खोदून, अर्धवट नाल्या, अर्धवट रस्ते केल्यांने व या कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे अजूनही बुजविण्यात न आल्यांने अपघाताची षक्यता अधिक बळकट होत आहे.
    गांधी चौक मूल येथे रस्त्याचे कोणत्याही भागात स्पिड ब्रेकर नाही, वाहतूक पोलिस जागेवर राहत नाही,  अजूनपर्यंत कामेही पूर्णत्वास आली नाही.  चारही बाजूने अंदाजाने लोक स्पिडने गाडया आणत असल्यांने, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्यांची भिती निर्माण होत आहे.
    मुख्य रस्त्याप्रमाणेच गावातील अंतर्गत रस्त्याचीही तीच अवस्था असून, रस्ते नालीचे कामे पूर्ण होवूनही साईडचे फुटपाथवरील भरण न भरल्यांने वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  गांधी चौक ते विश्रामगृह रोडवरील कामाला सुरूवात होवून वर्श लोटले तरीही ते काम पूर्णत्वास आले नाही.  सिनेमा टॉकीज पासून ताडाळा रोड वरील मार्गाचीही तीच अवस्था असून, रस्ता तयार केल्यानंतर पुन्हा साईडची गिट्टी काढून नळाची पाईप लाईन टाकण्यात आली आहे.  बाजार चौकातील रस्ताही अर्धवटच करण्यात आला आहे.  ठेकेदारांचे नियोजन नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाÚयांवर कुणाचा वचक नाही, त्यामुळे ना. मुनगंटीवार यांचे विकासाचे स्वप्नांना छेद देण्यांचा एककलमी कार्यक्रम राबविला जात असून, यामुळे मूल वासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.