मूलचे घरटॅक्स कमी करण्याचे मुख्याधिकारीचे संकेत श्रमिक एल्गारच्या आवाहनाला मूल वासीयांचा प्रतिसाद

मूलचे घरटॅक्स कमी करण्याचे मुख्याधिकारीचे संकेत
श्रमिक एल्गारच्या आवाहनाला मूल वासीयांचा प्रतिसाद
बेकायदेषीर घरटॅक्स रद्द करा.. षेकडो नागरीकांचे आक्षेप दाखल
मूल (प्रतिनिधी)
मार्च एंडिगच्या कामामुळे श्रमिक एल्गारच्या निवेदनावर निर्णय घेण्यास उषीर झाल्यांचे मान्य करीत, मूल षहरातील घरटॅक्स कमी करण्यांचे स्पश्ट संकेत, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांचेषी चर्चा करतांना दिले.
‘मूल षहरात सुलतानी घरटॅक्स’ या मथळयाखाली पब्लिक पंचनामामध्ये सविस्तर वृत्त प्रकाषीत झाले होते. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनीही नगर परिशदेच्या बेकायदेषीर घरटॅक्सचा मुद्दा उचलून धरला व या टॅक्सच्या विरोधात नगर परिशदेकडे तक्रार करण्यांचे जाहीर आवाहन केले होते.  या पाष्र्वभूमीवर दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता श्री. सरनाईक यांनी श्रमिक एल्गारचे विजय सिध्दावार यांचेषी चर्चा करीत नपची बाजू स्पश्ट केली.
भांडवली मुल्यांवर व वार्शिक भाडेमुल्यांवर आधारीत घरटॅक्स लावण्यांच्या पध्दतीपैकी नपने वार्शिक भाडेमुल्यांवर आधारीत घरटॅक्सची आकारणी केली आहे.  स्वतंत्र वस्तीचे झोन न पाडता, वस्तीतील रस्त्याचा    आधार घेवून तीन प्रकारचे दर आकारणी केली आहे. यात काही चुका झाले असतील तर त्या दुरूस्त करता येईल, श्रमिक एल्गारने दाखल केलेल्या केसेसवर योग्य षिफारस करून नगर रचनाकार विभागाकडून टॅक्स कमी करविण्यात येईल असे स्पश्ट करून, टॅक्स कमी करण्यांचे संकेत त्यांनी दिले.
 मूल षहरातील मालमत्ता धारकांचा मालमत्ता करांचा तपषिल वेबसाईटवर टाकण्यात आला आहे, मात्र ते सार्वजनिक न करता, प्रत्येकांला आपला टॅक्स पाहता येईल, लवकरच    मालमत्ताधारकांच्या तपषिलासह यादी सार्वजनिक करण्याचे देखिल त्यांनी मान्य केले.  याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी नप लवकरच चर्चेसाठी बैठक बोलविणार असल्यांचेही त्यांनी सांगीतले.  या बैठकीत घसाराख् षिक्षण कर यांवरही चर्चा करण्याचे त्यांनी मान्य केले. मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांचेसह मुख्याधिकारी सरनाईक यांनीही घरटॅक्स कमी करण्यांचे तत्वतः मान्य केल्यांने, मूल वासीयांची  सुलतानी घरटॅक्स पासून सुटका होणार आहे.
400  वर आक्षेप अर्ज दाखल

मूल नगर परिशदेने बेकायदेषीर लावलेले घरटॅक्स रद्द करावे व कराची नव्याने आकारणी करावी यासाठी नागरीकांनी आक्षेप दाखल करावे असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी मूल वासीयांना केले.  या आवाहनाला प्रतिसाद देत, सुमारे 400 चे वर नागरीकांनी आपले आक्षेप श्रमिक एल्गारच्या माध्यमातून नगर परिशदेकडे दाखल केले आहे.  हे सर्व आक्षेप अर्ज श्रमिक एल्गारने नपकडे जमा केले असून, या आक्षेप अर्जावर सकारात्मक निर्णय न झाल्यास, श्रमिक एल्गार आंदोलनात्मक मार्ग स्विकारणार आहे.
1600 भूखंडावर मालमत्ता करच नाही
मूल षहरात प्लाॅटचा व्यवसाय करणाÚयांनी खुले भुखंड विकत घेतले, मात्र हे प्लाॅट अकृशक करतांना, त्यातील आदेषाप्रमाणे घरटॅक्स भरलाच नाही.  घरटॅक्सची आकारणी न केल्यांने लाखो रूपयाचे नुकसान नगर परिशदेला सहन करावे लागत आहे.  ही बाब मुख्याधिकारी सरनाईक यांनी मान्य केली व 1600 प्लाॅटला नियमानुसार घरटॅक्सची आकारणी करून, टॅक्स वसूली करण्यात येईल असे मान्य केले.