ठाणेदार कोकाटे यांची दबंग कारवाही
मूल पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे रूजू होताच अवैदय धंदयाविरोधात धडक कारवाही सूरू केली आहे. येथिल ठोक दारूविक्रेता नर्सिग गनवेनवार (अण्णा) ला मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाष कोकाटे यांनी दिनांक 15 एप्रिलला अटक केली.
1 एप्रिल 2015 पासुन चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आलेली आहे. दारूबंदीमुळे मूल तालुक्यात शांततेचे वातावरण निर्माण झाले असतानाच काही असामाजीक तत्वांच्या लोकांनी दारूविक्री सुरू केली. नवे ठाणेदार म्हणुन कोकाटे रूजू होताच त्यांनी अवैध दारूविक्रेत्यांचे विरोधात मोहिम उघडल्याने मोठा दारूसाठा व मुद्देमालासह आरोपी गजाआड होत असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहेत. 26 मार्च 2016 ला ठाणेदार कोकाटे यांच्या मार्गदर्शणात मूल पोलीसांनी 50 पेटया दारू पकडले होते त्या कारवाहीतुन दिनांक 15 एप्रिलला नर्सिग गनवेनवार (अण्णा) याला पकडण्यात आले. ठोक अवैध दारू विक्रेत्याला अटक केल्याने इतर अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दनाणले आहेत व अवैध दारूविक्रेत्यांत दहषत पसरलेली आहे. ठाणेदार कोकाटे यांच्या दबंग कारवाहीने मूल शहरातील जनता अभिनंदन करित आहेत. यावर काही लोकांनी वाॅट्सअप वर ठाणेदारांचे अभिनंदन करित प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
कोरपना येथिल भाजपाचे नेते आबिद अली यांनी जनभावना जानीवेतुन अपैक्षा पुर्ण केली जनसुनावणीमध्ये महिलांनी अवैध दारूबाबत पोलीसांवर षंका घेत होते. मात्र मूलचे ठाणेदार कोकाटे साहेब रामनवमीच्या शूभदिनी मुल दारूकिंगचा डंका वाजविला आपली भुमिका व कर्तव्याबद्दल अभिनंदन!
भिसी येथिल पुण्य नगरी वृत्तपत्राचे पत्रकार पंकज मिश्रा यांनी ठाणेदार कोकाटे यांनी अवैध दारूच्या ठोक विक्रेत्याला पकडुन चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीसांसमोर एक आदर्ष निर्माण केला आहे. अषाच प्रकारची कारवाही चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेलगत असणा—Úया पोलीस ठाण्यामार्फत व्हायला पाहिजे. सिमेवरूनच दारू जिल्ह्यात येते परंतू सिमेलगतच्या पोलीस ठाण्यात अवैध दारूविक्रेत्यांचे आर्थिक हितसंबंध सलोख्याचे असतात. ठाणेदार कोकाटे साहेब यांचे मनापासुन अभिनंदन!
गडचांदुर येथिल लोकशाही वार्ताचे पत्रकार मुमताज अल्ली यांनी ठाणेदार कोकाटे साहेब ठोक दारूविक्रेत्याला अटक केले. हे कौतुकास्पद असुन जिल्ह्यातसुध्दा अशि कामगीरी बाकीच्या ठाणेदारांनी केली तर ख—या अर्थाने संपुर्ण दारूबंदीचे चित्र पहायला मिळेल यात दुम्मत नाही. कोकाटे साहेबांना मनापासुन अभिनंदन!
मूल येथिल सचिन बोर्डावार या युवकाने ठाणेदार कोकाटे साहेबांनी मूलमध्ये आल्यापासुन एक आदर्श निर्माण केलेला आहे. संपूर्ण दारूबंदी फक्त कागदावरआहे. पुर्णपणे दारूबंदीसाठी जिल्ह्यात कोकाटे साहेबांची गरज आहे. यासाठी पालकमंत्री साहेबांनी महत्वाची भुमीका बजावली पाहीजे. साहेबांनी आल्यापासून केलेल्या कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
पोंभूर्णा तालुका देवाळा येथिल सामाजिक कार्यकर्ते विनोद मारषेट्टीवार यांनी कोकाटे साहेबांसारखे ठाणेदार इतरही पोलीस ठाण्यात पाहीजे असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.
वरोरा येथिल सामाजिक कार्यकर्ता अमित आसेकर यांनी मूल येथिल ठाणेदार कोकाटे साहेबांनी केलेली कार्यवाही, जिल्ह्यातील इतर ठाणेदारांसाठी आदर्शच ठरली आहे, इतर ठाणेदारांनी अशीच कामगिरी केली तर या जिल्ह्यात अवैध दारू विक्री होणार नाही, आणि चंद्रपूर जिल्ह्याच नाव संपूर्ण राज्यात घेतलं जाईल, हे शक्य होईल ते फक्त आणि फक्त जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या बळावर, ते धाडस आणि सामथ्र्य जिल्ह्यातील पोलीसांमध्ये आहे, गरज आहे ती फक्त धाडस आणि सामथ्र्य कायदा खिषात घालणा—या ......दाखविण्याची कोकाटे साहेबांचे हार्दिक अभिनंदन जयहिंद......!
त्याचपमाणे राजोच्या राहुल जक्कुलवार या युवकाने, भाजपा मुल सोषल मिडियाचे अजय कोत्तुलवार आणि मुल येथिल अविनाष गरपल्लीवार यांनीही ठाणेदार कोकाटे साहेंबांचे मनापासुन अभिनंदन केले!

