महसूल कर्मचा—यांचे जिल्हाभर लेखणीबंद आंदोलन

महसूल कर्मचा—यांचे जिल्हाभर लेखणीबंद आंदोलन
मूलः महसूल कर्मचा—यांच्या प्रलंबित मागण्या शासनाकडून निकाली काढण्याकरीता महसूल संघटनेच्या दि. 10 मार्च 2016 चे आंदोलनाच्या रूपरेशेनुसार जिल्हाभरातील महसूल कर्मचा—यांनी दि. 12 एप्रिल 2016 ला लेखनीबंद आंदोलन केले. यात जिल्हाभरातिल महसूल कर्मचा—यांसमवेत मूल तालुक्यातील सर्व महसूल कर्मचा—यांनी लेखनीबंद ठेवून आंदोलन पूढे रेटले आहे.
महसूल कर्मचारी संघटना शाखा मूल चे अध्यक्ष संतोश खोब्रागडे, सचिव डी.एल.कटलावार सल्लागार दिलीप मोडक, विजय पेंढारकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे दि. 11 एप्रिल 2016 ला उपविभागीय अधिकारी मूल यांना निवेदन देवून, लेखनीबंद आंदोलनाची सूचना देत महसूल कर्मचा—यांच्या मागण्याचे निवेदन दिले होते.
दि. 20 एप्रिल 2016 ला संघटनेतर्फे जिल्ह्याचे ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असून दि. 1 मे 2016 मंत्रालयासमोर बेमूदत उपोषण करण्यात येणार असल्याचे पदाधिका—यांनी स्पष्ट केले आहे.