दारूबंदी यशस्वी करण्यासाठी कडक अंमलबजावणी सरकारने करावी-अॅड. पारोमिता गोस्वामी

दारूबंदी यशस्वी करण्यासाठी कडक अंमलबजावणी सरकारने करावी-अॅड. पारोमिता गोस्वामी  
दारूबंदीसाठी लढणा—या महीला सावित्रीच्या लेकी असुन क्रांतीकन्या ठरल्या आहेत त्यांचा सन्मान करणे समाजाचे व शासनाचे काम आहे व दारूबंदीची कडक अंमलबजावणीसाठी सरकारने पाऊल उचलावे असे मत अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सावली येथील महीला दारूबंदी जनसुनवाई व क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार कार्यक्रमात व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीला एक वर्ष झाल्यानिमीत्त मूल उपविभागांतर्गत सावली येथिल चरखा संघ पटांगणात महीला दारूबंदी जनसुनवाई व क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार कार्यक्रम पार पडला. सुनिता झाडे, सिंधुबाई आवारी, यात्रीका कुमरे, सायली बावणे, शाारदा सोनटके, अरूणा गेडाम,  आदी महीलांनी दारूबंदीचे अनुभव व्यासपीठावरून कथन केले. यावेळी दारूबंदीसाठी कार्य करणा—या कांग्रेसच्या सरचिटणीस नंदा अल्लुरवार, वच्छला लटारे, दारूबंदी समिती निमगांव, दारूबंदी समिती डोंगरगांव यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व 5000 रूपये रोख देऊन क्रांतीकन्या सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्व.खटीजा बेगम यांचे स्मृतीप्रित्यर्थ आबिद अली यांचेकडुन, पुण्यष्लोक अहील्याबाई होळकर स्मृती डाॅ. तुषार मर्लावार यांचेकडुन, स्व. बाबुरावजी सुरमवार यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रविण सुरमवार यांचेकडुन, स्व. प्रतिभा तगलपलीवार यांचे स्मृतीप्रित्यर्थ विजय सिध्दावार यांचेकडुन पुरस्कार देण्यात आले.  यावेळी दारूबंदी झाल्यापासुन दारूपिणे सोडणाÚया 5 पुरूषांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जनसुनवाई पॅनलमधील अॅड. कविता माहोरकर यांनी महीलांच्या लढयाला सलाम करून पोलीसांनी महीलांचे प्रश्न ऐकुन घेण्यासाठी हाजर न राहील्याची खंत व्यक्त केली. आबिद अली यांनी कोणत्याच धर्मात दारूचे समर्थन केलेले नाही त्यामुळे सरकारने दारूविक्रेत्यांची गय करू नये. पत्रकार प्रमोद उंदिरवाडे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे पूर्वसंध्येला कार्यक्रम होत असल्याने त्यांचे प्रतिमेचेच पूजन न करता त्यांनी दिलेल्या व्यसनमुक्तीे प्रतिज्ञेचे पालन करावे असे आवाहन केले. डाॅ. तुषार मर्लावार यांनी दारूमुळे आरोग्यावर होणारे वाईट परीणामावर माहीती देऊन अनादीकालापासुन दारूबंदी सांगीतल्याचे विषद केले. संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, यांनीही मार्गदर्षन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोरेवार यांनी संचालन अनिल मडावी तर आभार दिनेश घाटे यांनी मानले.