दारूमुक्तीसाठी कार्य करणा—या महिलांचे लढे माध्यमानी सकारात्मकरित्या पुढे आणावे - अॅड. पारोमिता गोस्वामी
दारूमुक्तीसाठी कार्य करणा—या महिलांचे लढे माध्यमानी सकारात्मकरित्या पुढे आणावे - अॅड. पारोमिता गोस्वामी
गडचांदुर येथे चंद्रपुर जिल्हा दारूबंदी वर्षपुर्ती निमित्त दारूबंदी महिला जनसुनवाई व क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात अॅड. गोस्वामी यानी दारूमुक्तीचे कार्य महिला करीत आहेत व यामुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल झाले आहे. महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचे लढे माध्यमानी सकारात्मकरित्या पुढे आणावे असे मत व्यक्त केले.
चंद्रपुर जिल्ह्यात 1 एप्रिल पासुन दारूबंदी करण्यात आली असुन 1 वर्ष पुर्ण झाल्यानेे वर्षपुर्ती निमित्त राजुरा उपविभागात अंर्तगत महिला दारूबंदी जनसुनवाई व क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार वितरण सोहळा गडचांदुर येथे पार पडला. या कार्यक्रमात अॅड. गोस्वामी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की दारूबंदीमुळे जिल्हयात महीलांवरील अत्याचारात घट झाली आहे, जिल्हयातील गुन्हे कमी झाले आहेत, अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे मात्र तरीही जिल्हयात काही समाजकंटक दारूबंदीला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न आपल्या महीलांनी हाणुन पाडला पाहीजे असे आवाहन गोस्वामी यांनी महीलांना केले. गावात कार्य करणारे महीला जयश्री किन्नाके, मिनाताई बोबडे, लक्ष्मीबाई कुसाम, मंदा किन्नाके, रत्नमाला पेंदोर, प्रनिता फुलमारे, इंदिरा कुळमेथे, आदी महिलानी दारूबंदी मुळे गावात चांगले बदल झाले आहेत परंतु पुर्ण दारूबंदी करण्यासाठी पोलिस सहकार्य करीत नाहीत, दारू विक्रेते लवकर सुटतात, पोलीस पैसे घेवुन कार्यवाही करीत नाही, अवैद्य दारू काही प्रमाणात सुरू असल्याची खंतही व्यक्त केले . या वेळी क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार स्व. कमलताई निलकंठराव देशमुख यांचे स्मुर्तीप्रित्यर्थ डॉ रजनी हजारे यांचे कडुन, स्व. डॉ राजीव नयन यांचे स्मुर्तीप्रित्यर्थ डॉ कल्यान कुमार यांचे कडुन, श्रीमती सुकुमारीदेवी गोस्वामी यांचे स्मुर्तीप्रित्यर्थ अॅड पारोमीता गोस्वामी यांचे कडुन व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मुर्ती पुरस्कार पप्पुभाऊ देशमुख यांचे कडुन देण्यात आले. सदर क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार विमल कोडापे, निर्मला मडावी, दारूबंदी समिती आवाळपुर, दारूबंदी समिती हरदोना याना 5000 रूपये रोख, स्मुर्तीचिन्ह व प्रमानपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात डॉ रजनी हजारे, पत्रकार विकास कुंभारे, कामगार नेते विजय ठाकरे, शामराव कोटनाके, विजय सिध्दावार, पत्रकार सिध्दार्थ गोसावी, किर्तीकुमार श्रीनिवास्तव, मुमताज अली, बादु पा. मेश्राम, निता खनके, गडचांदुरचे पो.निरिक्षक विनोद रोकडे, गुरूदेव सेवा मंडळाचे प्रसारक किन्नाके व इतर मान्यवरानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोरेवार, संचालन राजुरा विभागिय संघटक घनश्याम मेश्राम यानी तर आभार संगिता गेडाम यानी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिनेश घाटे, तुळशिराम किन्नाके, मारोती सिडाम, नामदेव उदे, कवडु किन्नाके, इंदीरा कुळमेथे, देविदास कुळसंगे यानी परिश्रम घेतले.कार्यक्रमात हजारो संख्येने महिला सहभागी होते.



