दारुबंदी हे माझे काम नाही का?
दारुबंदी हे माझे काम नाही का?
@ दारुमुळे माझ्याच कुटुंबातील वडील, मुलगा, भाऊ बरबाद होत असतांना मी केवळ बघ्याची भूमिका घेत असतो@ दारुमुळे केवळ पिणा-याचे नूकसान होते असे नाही तर न पिणा-यालाही त्रास होतो, न पिणा-यालाही पिणा-याकडुन मारहाण, खून, अपघात, बलात्कार असे प्रकार होतात. अपघात घडला तर तोंडातुन आपसुकच पिऊन असेल असे शब्द येतात
@ दारु हे वाईट असल्याने कोणत्याच संतानी समर्थन केले नाही. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधानात दारुबंदी सांगीतली आहे
@ आपण गावात अनेक फुशारकी मारत असतो मात्र दारुविक्रेत्याला घाबरत विरोध करीत नाही
@ मुलगा, वडील, भाऊ पिऊन त्रास देत असेल तर त्याला मारझोड करतो मात्र ज्या दारु विक्रेत्यामूळे माझे घर बरबाद होत आहे त्याची दारुविक्री बंद करण्याची हिम्मत दाखवित नाही
@ आपल्या गावात सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी आहेत, नेते म्हणुन वावरतात मात्र आपल्याच गावातील साधी दारुबंदी करीत नाही हे कसले नेते?
@ दारुबंदी हे महीलांचे काम आहे असे सांगुन जबाबदारी झटकतो मात्र ज्या मुलीची, बहीणीची, आईची सुरक्षा आपण करायला पाहीजे त्यांना दारुबंदी करायला सांगतो
@ जरा विचार करा दारु ही आपल्या घराची नव्हे तर माझ्या घराची बरबादी करित असतांना मी मात्र केवळ वाटस्अप, फेसबुकवर चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी फसली हे बोलतो आहे.
दारुविक्रीला समर्थन देऊन माझेच कुटुंबाचे नुकसान करीत तर नाही ना ? हा विचार करा आणि दारुबंदीसाठी पुढे या.

