चितेगाव येथे जागतिक वनदिन साजरा

चितेगाव येथे जागतिक वनदिन साजरा
मुल तालुक्यातील चितेगाव येथे 21 मार्च हा जागातिक वन दिन विभागिय वन अधिकारी चंद्रपुर श्री.धाबेकर यांच्या मार्गदर्शनात संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत चितेगाव व जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने  वृक्षारोपन करून वन दिन साजरा करण्यात आला.
      यावेळी वनाचे महत्व सांगितले. झाडे लावा झाडे जगवा असे सांगुन मानव वन्यजिव संघर्ष, जंगलात आग लागु नये वा लागल्यास यावर उपाययोजना व तेंदु हंगामाबाबत महत्व पटवुन दिल्या गेले. गावात जनजागृती रॅली काढण्यात आली.
      या कार्यक्रमात विभागिय वन अधिकारी चंद्रपुर श्री.धाबेकर, वनपरीक्षेत्र अधिकारी सावली एम.पी.राठोड,वनरक्षक निरंजने, वनरक्षक देवगडे, गावच्या सरपंच ज्योती मेश्राम, ग्रामसेवक सुजित येरोजवार, ग्राम पंचायत सदस्य हरीदास गोहणे, शाळेच्या मुख्याधिपीका कु. कुळसंगे यांचेसह शिक्षक, गावकरी महिला उपस्थित होते