नकाषे बदलले कसे?

नकाषे बदलले कसे?
भूमी अभिलेख कार्यालयाने एकाच गटाचे बदलविलेला नकाषाचा आकार
मूल - बेंबाळ येथील जमीनीच्या प्रकरणात महसूल अभिलेखा प्रमाणे  वासुदेव नारायण षेंडे यांची 10 आर जमिन मोजून हद्द कायम करून देण्यास टाळाटाळ करणाÚया तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने चक्क षेंडे यांचे जमिनीचा नकाषाच पार बदलवून टाकला असल्यांचे दिसून आले आहे. सतत राजकीय दबावात असणारा हा विभाग अनेकांना हेलपाटे खाण्यास बाध्य करीत असल्याचा आरोपही या कार्यालयातील अधिकारी/कर्मचाÚयांवर होत आहे.  बेंबाळ येथील जमिनीचा वाद वाढविण्यासही हेच अधिकारी कारणीभूत असून, कायद्याप्रमाणे काम न करता, राजकीय दबावात षेंडे कुटूंबियांची जमिनीचे क्षेत्र कमी करण्यांचा घाट घातल्या जात असल्यांचेही दिसून येत आहे.
षेंडे कुटूंबियाकडे 1919 पासूनचे आजतागायत 10 आर जमिनीचे दस्ताऐवज, आकारफोड व नकाषे आहे.  मुळ नकाषाप्रमाणेच त्यांचा ताबा व वहिवाट आहे, हे क्षेत्र बदलविण्यात आल्याचा कोणताही रेकार्ड, आदेष अथवा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयात नसल्यांचे खुद्द भूमीअभिलेख विभागाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहीतीत नमुद केले आहे.  असे असतांनाही मात्र जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याचा कांगावा करीत, षेंडे कुटूंबियाचे जागेतून बळजबरीने ग्राम पंचायत बेंबाळ रस्ता काढण्याचा प्रयत्न करीत आहे.  तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने मात्र नकाषा बदलवून, हद्द कायम न करता, मोजणीही न करता राजकीय दबावात ज्या दिवषी मोजणीच झाली नाही त्या दिवषीचा बनावट ‘क’ प्रत तयार करून षेडे यांचेकडे पोस्टाने पाठविण्यात आला आहे. सदर ‘क’ प्रतीमध्ये अर्जदाराचे रेकाॅर्डवरील क्षेत्र किती आहे, किती जागेत वहीवाट आहे, अतीक्रमण असल्यास किती जागेत आहे असा कोणताही उल्लेख न करता बनावट ‘क’ प्रत बनविल्यामुळे गावात तणाव निर्माण होऊन षेंडे कुटुंबियांवर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रीया आहे. गावात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास भुमी अभिलेख जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.
याबाबत जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख यांचेकडे वासुदेव षेंडे यांनी तक्रार दाखल करून दुरूस्तीची मागणी केली आहे.