तापाने विव्हळणा-या विद्यार्थिनीला रजा नाही
वडिलांची विनंतीही धुडकावली सॅन्जो कॉन्व्हेंट स्कूलमधील प्रकार
गोंडपिपरी (प्रतिनिधी)
गोंडपिपरी येथील नामांकित सॅन्जो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता 8 व्या वर्गात शिक्षण घेणाÚया विद्यार्थिनीला ताप आला. वडिलांच्या विनंतीनंतरही शाळा व्यवस्थापनाने तिला रजा न देता तसेच विव्हळत शाळेत ठेवले. यामुळे संतापलेल्या पालकाने अखेर शिक्षण विभागाचे कार्यालय गाठून रितसर तक्रार नोंदविली. ही घटना गोंडपिपरी येथील सॅन्जो कॉन्व्हेंट स्कूल येथे घडली. या प्रकारामुळे पालकवर्गात कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक शहरात गेल्या अनेक वर्षापासून बालकांचे सीबीएसी अभ्यासक्रम असलेले सन्जो कॉन्व्हेंट कार्यरत आहे. आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या हेतूने शहरातील बहुतांश पालकवर्ग या शाळेत आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवित आहे. मात्र कुठल्यानकुठल्या कारणामुळे सदर शाळा व्यवस्थापन चर्चेचा विषय बनत असून या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सदर शाळेत शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणाहून विद्याथ्र्यांना परीक्षेपासून काही काळ वंचित ठेवण्याचा प्रकारही घडल्याची माहिती आहे. इयत्ता 8 वीमध्ये शिक्षण घेणारी आंचल विजय ठाकरे ही विद्यार्थिनी नियमित वेळेवर शाळेत गेली. मात्र तिला तापाची कण-कण जाणवत असल्याने वडिलांच्या नकारानंतरही तिने अभ्यासक्रम व शालेय शिस्तीच्या धाकाने शाळेत जाणे गरजेचे असल्याचे सांगत शाळेत जाणे पसंद केले. तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करीत तिचे वडील विजय ठाकरे यांनी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान सलग दोनदा शाळेला भेट देवून आपल्या पाल्याचा ताप वाढत असल्याचे सांगत शाळा व्यवस्थापनाकडे सुटी देण्याची विनंती केली. मात्र शाळा व्यवस्थापनाने वडिलाची विनंती धुडकावून आचल हिला वडीलांसोबत जाऊ देण्यास नकार दिला. शाळा सुटेपर्यंत सुटी मिळणार नाही, असे वडीलास बजावले. यावरुन विजय ठाकरे यांनी शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार केली आहे. केवळ शालेय शिस्त व शाळेच्या नियम अटी भंग होऊ नये म्हणून तापाने विव्हळत विद्यार्थिनीला शाळा सुटेपर्यंत रजा न दिल्याने पालकात संताप व्यक्त केला जात आहे. गटशिक्षणाधिकारी शाळाव्यवस्थापनाविरुद्ध काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.