दारूबंदीच्या मागणीसाठी बॅरिकेट्स तोडले
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन आलेल्या 30 महिलांनी गुरुवारी पोलिसांच्या नाकी नऊ आणले. महिलांच्या शिष्टमंडळाला महसूलमंत्र्यांना भेटण्याचा निरोप न मिळाल्याने सहभागी आक्रमक झालेल्या महिलांनी बॅरिकेट्स तोडून विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी 35 महिला पोलिस शिपाई व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, यानंतरही मोर्चेकरी महिलांना रोखणे पोलिसांना शक्य झाले नाही.
"अस्तित्व' संघटनेतर्फे अध्यक्षा प्रेमलता वाघ-सोनोने यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम येथून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला पोलिसांनी टेकडी रोडवर रोखले. या ठिकाणी महिलांनी ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाच महिला, सात युवक आणि तीन पुरुष अशा एकूण 15 जणांनी मुंडण केले. महिलांनी दारूच्या बाटल्यांचे तयार केलेले हार गळ्यात घालून तसेच रिकाम्या बाटल्या रस्त्यावर ठेवल्या.
आंदोलन शांततेत सुरू असताना शिष्टमंडळाच्या भेटीसाठी महसूलमंत्र्यांकडून निरोप न आल्याने मोर्चेकरी महिला आक्रमक झाल्या. त्यांनी बॅरिकेट्स पाडण्यास सुरुवात केली. तर विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आणि पोलिसांमध्ये काही वेळ झटापट झाली. मोर्चास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिरिक्ति पोलिस मागवून मोर्चावर नियंत्रण मिळविले.