टेकाडीत पाण्यासाठी भटकंती
सावली (वार्ताहार)
वैनगंगा नदीवरील हरणघाट ठिकाणी बंाधलेल्या टेकाडी व 19 गावासाठी पाणीपुरवठा करणाÚया योजनेतुन अनेक गावात पाणीच पोहचत नसल्याने नागरीकांना भटकंती करावी लागत आहे.
उसेगांव, कवठी, पारडी, रूद्रापूर, चांदापूर, खेडी, चांदली बूज, सावली, टेकाडी, सादागड, चितेगंाव, बेलगाटा, चिखली, डोंगरगांव, उश्राळा, भादुर्णा, मोरवाही या गावासाठी टेकाडी प्रादेषिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली व कोटयावधी रूपये या कामासाठी खर्च करण्यात आले. या योजनेचे काम पुर्ण होऊन 2007 चे दरम्यान नळयोजनेला सुरवात करण्यात आली. सुरवातीला सर्व गावांना पाणी पुरवठा होत होते. मात्र कालांतराने नळ कनेक्षन वाढल्याने अनेक गावात पाणीच पोहचत नसल्याचे चित्र आहे. यात उसेगांव, सादागड, चितेगांव, चिखली, डोंगरगांव, मोरवाही, भादुर्णा, उश्राळा या गावात पाणीच पोहचत नसल्याने पिण्याचे पाण्यासाठी नेहमीच भटकंती करावी लागत आहे. ज्या गावांना पाणी पुरवठा होत आहे त्याही गावांना नियमित पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत आहे. अनेक ठिकाणी लीकेज असुन हे लिकेज बंद करण्यासाठी कंत्राटदार लक्ष देत नसल्याने नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची नळधारकांची बोंब आहे. सदर योजना बनवितांना एकुण 19 गावांना पाणी पुरवठा होणार असल्याचे प्रस्तावित असतांना फक्त 7-8 गावांसाठी पाणी पुरवठा होत असल्याने बाकी गावातील नळधारकांना नळासाठी विनाकारण आर्थीक भुर्दंड बसलेला आहे.