धडक कारवाईने दारूविक्रेते हादरले

मूल पोलीस- आठ दिवसात 10 लाखाचा माल जप्त

विजय कोरेवार/दिनेष घाटे -
मूल पोलीस स्टेषनमध्ये नविन ठाणेदार श्री. कोकाटे रूजू होताच दारूविके्रत्यांविरूध्द धडक कारवाई सुरू केली असुन आठ दिवसात तब्बल 10 लाखाचा दारूसाठा जप्त केल्याने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
चंद्रपूर जिल्हयात 1 एप्रिलपासुन दारूबंदी करण्यात आलेली आहे. दारूबंदीमुळे मूल तालुक्यात षांततेचे वातावरण निर्माण झाले असतांनाच काही असामाजिक तत्वाच्या लोकांनी अवैध दारूविक्री सुरू केली. नवे ठाणेदार म्हणून कोकाटे रूजू होताच, त्यांनी अवैद्य दारू विक्रेत्यांचे विरोधात मोहीम उघडल्यांने मोठा दारूसाठा व मुद्देमालासह आरोपी गजाआड होत असल्यांने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अवैद्य दारू विक्रेत्यांचे मनसूबे नव्या ठाणेदारांमुळे धुळीस मिळत असल्यांने, स्थानिक पोलिसातही उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे, अवैद्य व्यवसाय बंद करण्यांचे दृश्टीने ठाणेदारांनी त्यांचे कर्मचाÚयांना मार्गदर्षनाची भूमीका घेतल्यांने व त्यानुसार ठाणेदारंाचे मार्गदर्षनात कारवाई करून अवैध दारूविक्रीला लगाम घातले आहे. मूल षहरात काही बडे अवैध दारू तस्कर आहेत ते या भागात मोठया प्रमाणात दारू पुरवठा करतात त्यांचेवरही अषा पध्दतीने कारवाई झाल्यास मूल भागातून दारू हद्दपार होईल अषी नागरीकांमध्ये चर्चा आहे.
अडीच लाख रूपयाचे दारूसह 2 चारचाकी वाहने जप्त
मूल-मारोडा-पेठगांव मार्गावर चारचाकी वाहनाने दारूची वाहतूक करीत असतांना पोलीस उपनिरीक्षक मेघा गोखरे यांचे पथकांने 29 नोव्हेंबर रोजी रात्रौ 1 वाजताचे दरम्यान कारवाई केली आहे. सदर दारूची किमंत अडीच लाख रूपये असून चारचाकी वाहनांच किमंत साडेतीन लाख रूपये आहे. गौरव राजुभाई पटेल, सारंग चिंतलवार रा. सिंदेवाही, नितीन किसन कुंकलवार, अविनाष दादाजी लाकडे रा. राजोली असे आरोपीचे नांवे आहेत.
मूल पोलिस स्टेषनच्या पोलिस उपनिरिक्षक मेघा गोखरे यांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना असेंट क्रं. एम.एच.34 बी.टी. व मारोती 800 क्रं. एम. एच. 35 सी 8340 हे दोन चारचाकी वाहने संषयास्पद स्थितीत दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यात दारूसाठा आढळून आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ए. जे. कोकाटे यांचे मार्गदर्षनात पोलिस उपनिरीक्षक मेघा गोखरे, हेड काॅन्स्टेबल विजय रिठे, भगवान चैधरी, भय्या काळे, चालक पीसे यांनी केली.
चारचाकी वाहनासह सवा दोन लाखाची दारू जप्त
अंधाराचा फायदा घेत अवैदय दारूची वाहतूक करीत असल्यांची गोपनीय माहिती मूल पोलिसांना मिळाली व माहितीचे आधारे मूल पोलिसांनी 1 डिसेंबर रोजी 8 वाजताचे दरम्यान चारचाकी वाहनासह, सव्वा लाखाची देषी व विदेषी दारू पकडून जप्त करण्यात आली. चारचाकी वाहनाचे मालक घटनास्थळावरून पसार झाले.
मूल पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर रोजी रात्रौ 8 वाजताचे दरम्यान येथील स्मषानभुमी मार्गाजवळ नाकेबंदी केली. यावेळी एम. एच. 31 ए. जी. 9062 क्रमांकाचे वाहन मूलकडे सषंयास्पदरित्या मूलकडे येतांना दिसले, या वाहनाची तपासणी केली असता देषी दारूच्या 22 व विदेषी दारूची 1 पेटी आढळून आली. अंधाराचा फायदा घेत गाडीमालक पसार झाला. पोलीसांनी आरोपीविरूध्द मुंबई दारूबंदी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.